संजय टेंभुर्णे
कार्यकारी संपादक
दखल न्यूज भारत..
गरोदर मातेच्या आरेाग्याची काळजी घेतली, तर येणारे बाळ सुदृढ,निरोगी जन्माला येते.गरोदरपणाचा काळ हा खऱ्या अर्थाने मातेच्या आयुष्यातील काळजीचा काळ असतो.
पुढे निरोगी,सशक्त बाळाला जन्म देण्याचे मोठे आव्हान तिच्यासमोर असते.त्यामुळे मातेच्या गरोदरपणातील काळजी अत्यंत महत्वाची ठरते.गरोदरपणा सोबतच बाळाच्या जन्मानंतर पहिले दोन वर्षे काळजीचे असतात.बाळाच्या सुदृढतेसाठी हा कालावधी महत्वाचा असतो.
सुदृढ बाळाची लक्षणे…
नियमित वजन वाढणे,बाळाचे वजन योग्य प्रमाणात वाढत असणे हे सुदृढतेचे एक महत्त्वाचे लक्षण आहे.
बाळ शांत राहतात असेल आणि पुरेशी झोप घेत असेल,तर ते सुदृढ आहे असे मानले जाते.
३ महिन्यांच्या बाळांमध्ये डोके न हलवता स्थिर ठेवण्याची क्षमता विकसित होते,ही एक महत्त्वाची वाढ आहे.
तद्वतच दिवसातून साधारणपणे ८ ते १० ओले डायपर असणे हे बाळाच्या शारीरिक गरजा पूर्ण होत असल्याचे लक्षण आहेत अशा पध्दतीचे महत्वपूर्ण मार्गदर्शन प.स.सदस्य अनील किरणापूरे यांनी केले.
कार्यक्रमात पोषण आहाराविषयी गीत,पथनाट्य,समूहगीत सादर करण्यात आले.
मान्यवरांनी पोषण आहाराचे महत्त्व पटवून दिले.उमरी ग्रा.प. कार्यालय येथे पोषण महाअभियान कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी पं.स.सदस्य अनिल किरणापुरे,अध्यक्ष संरपच यशवंत कापगते,प्रमुख पाहुणे उपसरपंच भूमिता धकाते,डॉ.वसुंधरा डोंगरवार,नीलिमा करंजेकर,खुजे सर,रोहिणी पारधी,ललिता ब्राह्मणकर,कोल्हे मॅडम,सोनटक्के मॅडम,छगन पात्रीकर,ज्योती मेश्राम,भाग्यश्री लांजेवार,हर्षीला मडामे,वासंती धकाते,उषाबाई धकाते,उर्मिला राऊत,अन्नपूर्णा लाडे,दिपाली लाडे,मायावती मेश्राम,वंदना मेश्राम,सर्व ग्रामपंचायत सदस्य,गावकरी महिला,बालगोपाल उपस्थित होते.
सूत्रसंचालन अन्नपूर्णा लांजेवार यांनी केले तर उपस्थिताचे आभार दिपाली लांडे यांनी मानले.



