रामदास महाराजांनी “मनाचे श्लोक”या ग्रंथात वरील श्लोक लिहून ठेवला आहे. मानव हा देह धारी प्राणी आहे. आणि या देहात मेंदू नावाचा एक अवयव आहे, त्या मेंदूत मन आणि बुद्धी या दोन गोष्टी आहेते. असे शास्त्रज्ञ सांगतात. देह म्हणजे रथ, या रथाची दोन घोडे म्हणजे एक चांगलं मन आणि दुसरे वाईट मन. हे दोन घोडे शरीर रुपी रथाला जिकडे घेऊन जातील तिकडे रथ जातो.
याचा अर्थ शरीर हे मनावर अवलंबून आहे. म्हणजेच मन जिकडे नेईल तिकडे हे शरीर जाते. परंतु एखादा निर्णय घ्यायचा असतो, त्यावेळी मनाची द्विधा अवस्था होते, कारण दोन मने म्हणजे रथाचे दोन घोडे यापैकी एक वाईट मन असते आणि एक चांगले मन असते , वाईट मन जेव्हा एखादा निर्णय घेत असते तेव्हा त्याला चांगले मन हे सांगत असते की त्या रस्त्याने जाऊ नये कारण त्या रस्त्याने गेल्यास धोका होईल, म्हणून आपण हारत या दुसऱ्या मार्गाने घेऊन जाऊ की ज्या मार्गाने धोका नाही, जर त्या वाईट मनाने या चांगल्या मनाचे ऐकले तर शरीर रुपयात चांगल्या मनाची ऐकून योग्य त्या मार्गाने जाईल की ज्या मार्गात धोका निर्माण होणार नाही, आणि जर समजा वाईट मनाने त्याचे नाही ऐकले आणि जबरदस्तीने धोका असलेल्या मार्गानेच जर वाईट मनाने जोर लावून जाऊ लागले तर या चांगल्या मनाची ताकद कमी पडते आणि रथ हा ज्या मार्गाने धोका आहे त्याच मार्गाने जातो आणि मग एक्सीडेंट होतो.
चांगला विचार करणारा घोडा आणि त्याची ताकद म्हणजे चांगल्या मनाची ताकद जास्त असली किंवा त्यांनी जास्त ताकद लावली तर वाईट मनाचा घोडा आपोआप फरफट जातो आणि चांगल्या मार्गाने रथ बिना संकट तो रस्ता पार होतो. याचा अर्थ चांगले मनाने वाईट म्हण म्हणजे या दोन शरीरुपिरथाचे घोडे यापैकी ज्याची म्हणजे ज्याने जास्त ताकद लावली त्या रस्त्याने हा शरीर रुपी रथ जात असतो. परंतु या दोन्ही घोड्यांना नियंत्रण करणारी “बुद्धी “नावाचा लगाम असतो, दोन्हीपैकी ज्या घोड्याचा लगाम ढिला होईल तो घोडा भरदार धावतो त्याची ताकद वाढते आणि दुसरा घोडा आपोआप त्या घोड्यासोबत रथ ओढीत असतो.
बुद्धीरुपी यालगामाची पण द्विधा अवस्था असते, म्हणजे बुद्धीला वाटते की या घोड्याचा लगाम दिला करू की त्या घोड्याचा लगाम दिला करू, की दोन्ही घोड्याच्या लगाम ढीला करू की ताणून धरू, दोन्ही घोड्याचा लगाम दिला गेला किरण अधिकच भर धाव धावतो आणि दोन्ही घोड्याचा लगाम ताणून धरला तर प्रथा चा वेळ कमी होतो किंवा अधिकच लगाम ताणला तर परत जागेवरच उभा राहतो, याचा अर्थ बुद्धी म्हणजे लगाम कोण्या गोडात घोड्याचा लगाम ढीला करावा किंवा ताणून धरावा हे बुद्धीच्या हातात असते म्हणजेच लगाम ताणण्यानुसार शरीर धावत असते.
या रथाचा सारथी ” विवेक म्हणजे प्रज्ञा बुद्धी “असते. आणि यासारखे च्या हातात लगाम असतो, बुद्धीची जेव्हा द्विधा मनस्थिती निर्माण होते तेव्हा विवेक बुद्धी किंवा प्रज्ञा बुद्धी हे निर्णय घेत असते, म्हणजेच बुद्धीला सांगत असते, मार्गदर्शन करते, उपदेश करते. त्यानुसार बुद्धीरुपी लगाम हा निर्णय घेत असतो, बुद्धी रुपी लगाम विवेक रुपी सारथीच्या हातात जरी असला, तरी विवेकाचे ऐकायचे की नाही ऐकायचे हे बुद्धी ठरवीत असते, बुद्धीने विवेकाचे ऐकले तर भारत योग्य दिशेने जातो, आणि नाही ऐकले तर मात्र भारत चुकीच्या दिशेने जातो आणि अनर्थ घडतो.
अशाप्रकारे माणसाचे शरीर चांगल्या आणि वाईट ज्या मार्गाने जाते त्यानुसार जीवनाला अर्थ किंवा व्यर्थ प्राप्त होत असतो. म्हणून एखाद्या जीवनाचे सार्थक होते तर एखाद्या जीवनाचे निरर्थक होते, ते ह्या क्रियेमुळेच. म्हणूनच माणूस मेल्यानंतर आपण म्हणतो की, हा आला तसा गेला त्याच्या जीवनाला काही अर्थ नाही उरला. किंवा या माणसाने जीवनाचे सार्थक केले, माणूस मेल्यानंतर त्याला अशा प्रकारे या दोन्हीपैकी एक शेरा मिळत असतो.
आता आपण मुख्य विषयाकडे वळूया, माणसाने नेहमीच सत्य बोलावे आणि असत्य बोलू नये म्हणजेच सत्याचा स्वीकार करावा आणि असत्य सोडून द्यावे. हे घडण्यासाठी वरील देहरूपी रथाचे उदाहरण प्रमाणे चालले तर शक्य आहे. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की, सारीच माणसे परिस्थितीनुसार व्यवहार करीत असतात, म्हणजेच खरे बोलणे किंवा खोटे बोलणे हे परिस्थितीवर अवलंबून असते.
कर्म करीत असताना माणूस पुण्य कर्म म्हणजे चांगले कर्म करणे केव्हाही उचित असते आणि त्याच्या हिताचे असते आणि वाईट कर्म म्हणजे पाप कर्म करणे हे केव्हाही अनुचित असते म्हणजे त्याच्या हिताचे नसते, याचा अर्थ माणसाने जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत त्याने त्याच्या आयुष्यात किती पुण्य कर्म केले आणि किती पाप कर्म केले यावरून त्याच्या जीवनाचा ताळेबंद केला जातो, पाप पुण्याच्या ह्या त्याच्या कर्मावरून मग त्याचे जीवन किती सार्थकी लागले किंवा किती व्यक्त केले म्हणजेच त्याच्या जीवनाला किती अर्थ प्राप्त झाला हे समजते,, मरावे परी कीर्तिरूपे उरावे, असे म्हणण्याचे कारण म्हणजे माणसाने चांगले कर्म केले पुण्य कर्म केले तर तो किर्तीरूपाने उरतो आणि वाईट कर्म केले तर त्याची कीर्ती राहत नाही म्हणजे त्याचे कोणी नाव घेत नाही.
हे जरी खरे असले तरी माणूस जेव्हा एकमेकांशी किंवा समाजाशी किंवा नातेवाईकाशी व्यवहार करीत असतो तो व्यवहार हा त्याच्या परिस्थितीनुसार करत असतो, याचा अर्थ त्याची परिस्थिती त्यास किती अनुकूल किंवा प्रतिकूल आहे यानुसार तो व्यवहार करीत असतो, किंवा त्याच्या स्वभाव त आणि सभोवतीचा माहोल किती चांगला आणि वाईट आहे, यानुसार त्याचा व्यवहार होत असतो, म्हणजेच त्याच्या व्यवहारास परिस्थिती कारणीभूत ठरते, असे असले तरी विषम परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून देहरूपी रथातील सारथी विवेक बुद्धी चे लगाम बुद्धीने ऐकले तर नक्कीच योग्य निर्णय घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
कधीकधी परिस्थिती अशी असते की माणसाला सत्य काय आणि मिथ्य काय हे कळत असूनही वळत नाही. उदा. एखाद्याला एखादे वाईट व्यसन जडले आणि त्यास हे व्यसन वाईट आहे हे समजते तरी पण त्याचे शरीर त्याचे मन त्याची बुद्धी विवेकाच्या हातात नसते, म्हणून आईला जाणे त्याला व्यसन करावेच लागते, उदाहरणार्थ लिव्हर बिघडल्यानंतर माणूस मरतो, किडनी बिघडली की माणूस मरतो हे माहीत असू नये माणूस दारू पितो तो तिला सोडू इच्छित नाही आणि ती जर सोडली तर तो मरतो, याचा अर्थ धरल्यामुळे मरतो आणि सोडल्यामुळे पण मरतो, अशी असेल तर दारू सोडली की लगेच मरणार आहे हे असे असेल तर अजून चार दिवस जगण्यासाठी दारू पिलेली बरी असा तो निर्णय घेतो आणि मरेपर्यंत तो दारू पितो, अशी ही वस्तुस्थिती आहे, की जी आपणास मान्यच करावी लागते.
या विषयाची दुसरी बाजू अशी की, रामदास महाराज म्हणतात नेहमीच सत्य बोलावे असत्य बोलू नये, परंतु त्याआधी ” सत्य “म्हणजे काय ? आणि त्याचा शोध कसा घ्यावा ? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे, कारण कधी कधी असत्याला सत्य म्हटलं जाते आणि सत्याला असत्य म्हटले जाते. आपण अवैज्ञानिक अशास्त्रीय अशा बऱ्याच कल्पना किंवा संकल्पनांचा स्वीकार केलेला आहे उदा.देव ,त्याची पूजा आणि आराधना,धर्म,स्वर्ग,वैकुंठ, पाताळ, यम,चित्रगुप्त, पितृ वाढणे,म्हणजे माणूस मेल्यानंतरही त्याचा आत्मा शांत न राहता भटकत राहतो,म्हणून पी तर वाढा,भूत प्रेत, स ट वी,दैव ,भाग्य,अशा कितीतरी अतार्किक संकल्पना आणि अंधश्रद्धा आहेत की,जी सत्याच्या कसोटीवर टिकत नाहीत,तरी आपण त्यास सत्य मानून ,स्वीकारून त्यांना जीवनाचा एक भाग समजतो,अशा चुकीच्या समजुती नाही स्वीकारल्या,नाही पाळल्या तरी माणसाचे काहीच बिघडत नाही.
उलट अशा चुकीच्या,निराधार,निरर्थक गोष्टींचा अवलंब केल्यामुळेच माणसाची मानसिक बौद्धिक विवेकी प्रगती होत नाही. विवेकबुद्दीला अडसर होतो.विवेकाचा वापर न केल्याने हिंसा करण्यापर्यंत माणूस पोहचतो.म्हणून रामदास म्हणतात की,सत्यबुद्दीचा वापर करा,असत्य सोडून द्या.असत्य म्हणजेच निराधार गोष्टी, ज्यांना शास्त्राचा, वि दन्या न चा आधार नाही,ज्या गोष्टी तर्काच्या आणि अनुभवाच्या कसोटीवर टिकत नाहीत,अशा गोष्टी,असे विचार म्हणजे ” असत्य ” होय.परंतु सामान्य बुद्धीचे च काय पण बुद्धिवादी सुद्धा सत्याचा आधार न घेताच अनेक विचार मांडतात,अनेक अंधश्रद्धा पळतात.अशा चुकीच्या निरर्थक गोष्टींचे पालन केल्याने माणसाचे किती आर्थिक आणि मानसिक,शारीरिक नुकसान होते,वेळेचा किती अपव्यय होतो? याचे भान नसते.
यासाठी मिथ्य सोडून सत्य अंगिकारावे ,असे रामदास म्हणतात,पण सत्य कसे जाणावे? आणि मिथ्य कशाला म्हणावे? याचा उलगडा ते करीत नाहीत,हे मनाच्या स्लोकातील त्रुटी वाटते.सत्य मिथ्या वर भाष्य करताना ,त्याची व्याख्या करणेही तितकेच महत्त्वाचे आहे,कारण दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी केल्या शिवाय दूध आणि पाणी यातील फरक कळणार नाही.दुधात पाणी मिसळून दिले तर त्यास काय म्हणावे,? दूध की पाणी दिले ,? असा संभ्रम होतो,म्हणून आधी सत्य कशास म्हणावे ,? आणि असत्य कशाला म्हणावे? हे स्पष्ट झाल्याशिवाय ” मना सत्य ते सत्य बोलत जावे, मना मिथ्य ते मिथ्या सोडून द्यावे ” या श्लोकाचा अर्थ समजणार नाही.



