इंद्रायणी नदीतील प्रदूषण रोखण्यासाठी आयोजित साखळी उपोषणासाठी देहूच्या संत तुकाराम महाराज संस्थानचा पाठिंबा.

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : श्रीक्षेत्र आळंदी-देहूच्या कुशीतून वाहत असलेल्या इंद्रायणी नदीला वारकऱ्यांच्या मनात अतिशय पवित्र स्थान आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत इंद्रायणीचे प्रदूषण चिंतेचा मुद्दा झाला आहे. इंद्रायणी नदीत कंपन्यांचे केमिकलयुक्त पाणी, महापालिका, नगरपरीषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत हद्दीतील मैलायुक्त पाणी‌ सोडल्याने इंद्रायणी नदीत अतिशय प्रदूषण झाले आहे.हे सर्व रोखण्यासाठी इंद्रायणी सेवा फौंडेशनचे अध्यक्ष विठ्ठलराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली १ मे महाराष्ट्र दिनी आळंदी येथील माऊली मंदिराजवळ महाद्वार चौकात साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. या उपोषणाला संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला.

 

यावेळी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रशांत महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी उपोषण स्थळी सदिच्छा भेट दिली.

इंद्रायणी नदी स्वच्छ आणि प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविण्यासाठी देहू संस्थानच्या वतीने नक्की प्रयत्न केले जाईल असे आश्वासन संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष प्रशांत महाराज मोरे आणि माणिक महाराज मोरे यांनी दिले आहे.