दखल न्यूज भारतचे सर्वेसर्वा तथा मुख्य संपादक प्रदिप रामटेके सरांच्या वाढदिवस निमित्ताने….. — संकटावर मात करुन परिस्थितीशी खंबीरपणे झुंज देणारा एक लढवय्या योद्धा…. — एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व,तद्वतच कर्तव्यतत्पर,निर्भीड,संवेदनशील असे व्यक्तीमत्व….

प्रितम जनबंधु

  संपादक 

                 आपल्या निस्वार्थ, निर्भिड तथा कर्तव्यदक्ष जबाबदारीवर ठाम राहुन अनेक शिखरे पादाक्रांत करण्यासाठी परिस्तिथीसी अनवरत झुंज देणारे,पत्रकारितातंर्गत दांडगा अनुभव जोपासत निर्भीड कार्यप्रणालीतुन आपली आगळीवेगळी छाप पाडणारे एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक प्रदीप रामटेके सर होत.

              तद्वतच ते शांतीप्रिय,संवेदनशील,मनोधर्याचे धनी आहेत.तद्वतच एक पत्रकार ते मुख्य संपादक असा पत्रकारितेतील खडतर प्रवास पार करुन आपली प्रगत ओळख निर्माण करणारे दखल न्यूज भारतचे सर्वेसर्वा तथा मुख्य संपादक,आमचे प्रेरणास्थान आ. प्रदिपजी रामटेके सर यांचा आज वाढदिवस ..!

          प्रदीप रामटेके सरांचा एका शेतकरी कुटुंबात जन्म झालाय,घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असली तरी त्यांचा अनेक प्रसंगी खडतर प्रवास यशस्वी विचारांचा वाहणारा प्रवाह ठरला.याचबरोबर कठीण प्रसंगाना चिरत आपल्या प्रगतीची पाउलवाट त्यांनी स्वत: तयार केली असुन त्या खडतर वाटेवर यशस्वी वाटचाल अनवरत,अगदीच निरागसपणे करीत असल्याचे पावलोपावली जाणवते आहे.

           मुख्य संपादक प्रदीप रामटेके सरांनी कर्तव्यदक्ष, सहनशील व खंबीर नेतृत्व साकारत आड येणाऱ्या अनेक खडतर परिस्थितीवर मात करुन परिस्थितीशी झुंज देत अनेक यशाचे शिखर प्राप्त केले आहेत.

        एवढच नव्हे तर “दखल न्यूज भारत” पोर्टल च्या रुपाने स्वताच हक्काच व्यासपीठ उपलब्ध करुन बातम्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यासह,भारत देशातील जनसामान्याच्या समस्या निकाली लावण्यास महत्वाच योगदान देत आहेत. 

         सोबतच,”दखल न्यूज भारत,जनसामान्यांच्या मनामनात रुजले असून,”दखल न्यूज भारत परीवारातील,प्रत्येक पत्रकाराच्या जिवणप्रवाहाला सातत्याने गती दिली आहे.

       — तरंग विचारांचे सदैव वाहणारे,जनतेच्या हितासाठी निर्भिडता सांगणारे…

       — अस्तित्व स्वतःचे स्वाभिमानात बोलणारे, स्वाभिमान शून्य आयुष्य नकोय ते विकणारे…

       — निष्पक्षता त्यांची जवळ येऊ देईना दलालांना,वाऱ्यावर बोलणाऱ्यांची मती टिकेना त्यांच्या वास्तव्य वैचारिक संघर्षात…

          — वणवा दलालांचा दिसणार नाही,माझे म्हणूनी ते करणार सर्वांना हलाल..‌

         वरील प्रमाणे आपल्या निर्भिड विचारांतंर्गत पत्रकारिता क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्व, तद्वतच अभूतपूर्व लिखाणाच्या जोरावर आपला प्रभाव कायम ठेवत जनमानसात आपली आगळीवेगळी छबी निर्माण केली आहे. 

         अनेक अग्रलेख प्रकाशीत करुन,त्यासोबतच निस्वार्थ भावनेचा अंगीकार करुन पत्रकारीता कसी असायला हवी,पत्रकारिता करताना कोणकोणत्या बाबी कशाप्रकारे हाताळल्या जाव्यात,बातमी संकलीत करताना ते कशारितीने संकलीत करावी,बातमी संबंधाने इत्थंभूत माहीती कशी प्राप्त करता येईल यासाठी मुख्य संपादक प्रदिपजी रामटेके सर यांची कार्यपद्धत व प्रेरणा उल्लेखनीय ठरावी असिच आहे. 

          “इतरांसाठी सर्वकाही करतात पण स्वतः साठी देखील काही करावे हे ते विसरतात..खरंच प्रदीप सर तुमच्यासारखे आदरणीय व्यक्ती जगात खूप कमी भेटतात….”

          प्रखर विचारशील समाजमनाचे हित जोपासनारा,सहनशील,उज्वल भविष्यावर ताकद पणाला लाऊन अनेक यश संपादन करणारा,अष्टपैलुत्व व प्रभावशाली नेतृत्व साकारनारा, तद्वतच नशीबवान म्हणून भाग्याची शिदोरी सोबत घेऊन आलेला एक संवेदनशील लढवैय्या योद्धा मुख्य संपादक प्रदिपजी रामटेके सर यांना अवघ्याच काही दिवसात अनेक भाग्योदय प्राप्त झाले आहेत.

           शिवाय त्यांनी आपल्या निस्वार्थी,निर्भीड,कार्य कर्तृत्वाच्या जोरावर अनेक पारितोषिक मिळवित अभूतपूर्व यश संपादन केले आहेत. 

         म्हणूनच आदरणीय सरांच्या मौलवान कार्यकर्तृत्वाचा समर्पक वर्णन करने औत्सुक्याचे ठरेल.त्याना अगनीत शुभेच्या पुढील पंक्तीतुन……

      — तुमच्या कीर्तीचा लख्ख उजेड व्हावा,तुमचा आनंद गगनात न समावा…!

      असच सुख व समाधान तुमच्या पदरात पडत राहो,तुमचा हा वाढदिवस जल्लोषात साजरा होत राहो…!

      चंद्राच्या कोरिप्रमाणे आपलं आयुष्य असंच वाढत जावो….!

      आपल्याला हवं ते सगळं मिळत जावो….

        जन्मदिन आणि येणारा प्रत्येक दिवस आपलीच कीर्ती गावो…..

          अगदीच अनेक कामासाठी असलेली तुमची तगमग,जिद्द,चीकाटी,त्यामागचे उचीत व यथायोग्य समर्पण खरोखर प्रशंसनीय आणि प्रेरणादायी आहे. 

         तुमच्याकडून मला खूप सार्‍या गोष्टी शिकायला मिळाल्या आहेत..! आणी तुमची निस्वार्थी प्रेरणा संकटाच्या वेळी मला शक्ती प्रदान करीत असते.

        बातमीतील अमर्याद शब्दरचना वाचकांना अगदीच काव्यसंग्रह वाटावी अशाच शब्द शैलीत असते.सराचे लिखाण म्हणजे माझ्यासाठी एक प्रकारची शब्दसंपत्ती सारखीच आहे.

           आपण खरच माझे आदर्श ठरावे असीच आपली कार्यपद्धत आहे. प्रथमतः माझ्याकडून तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……

         पत्रकारिता करित असतांना त्यांच्या बातम्यांमुळे रामटेके सर अगदीच कुणालाही खटकतात,बोचतात,अनेकांच्या मनात खुपतात,त्यामुळेच त्यांचे विषयी काहीच्या मनात आजही अनेक गैरसमज आहेत.अनेकजण आजही सरांची बातमी शब्द न शब्द कॉपी करताना दिसतात.अनेकानी प्रसंग साधून त्यांचा खच्चीकरण करण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला आहे.

          पण ते डगमगले नाहीत, तर अनवरत मार्गक्रमण करीत राहीले.आ.प्रदीप रामटेके सरांनी आपला मनोधैर्य खचु दिले नाही,याउलट आपली प्रगत कार्यप्रणाली व कर्तबगार जबाबदारी सांभाळत अनेकांच्या ह्रदयात जागा मिळवली आहे.

         असे सोज्वळ व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करणारा अष्टपैलु संपादक म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही,अशीच सरांची विचारसरणी त्याच्या अभूतपूर्व संपादकीय,अग्रेलेख लिखाणातून सातत्याने दिसून येते आहे. 

         “एक व्यक्ती म्हणून नाही तर एक व्यक्तिमत्त्व म्हणून आयुष्य जगणारी व स्वतःची तत्वे असणारी आणि तत्वांशी प्रामाणिक असणारी माणसे या जगात कमीच असतात…

         मुख्य संपादक रामटेके सर यांची एकंदरीत कारकीर्द अनेकांना प्रेरणादायी ठरावी असीच आहे.चिमूर तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात शेतकरी व सामान्य कुटुंबात त्यांचा झालेला जन्म..

        अनेक संकटावर मात करीत उत्तम गुणत्वाला जोपासत पत्रकारिता क्षेत्रात रामटेके सरांनी आपली छबी निर्माण केली आहे आणी आज दखल न्यूज भारतचे मुख्य संपादक या पदावर कार्यरत राहुन महत्वाची जबाबदारी तत्परतेने पार पाडताना दिसून येत आहेत.

        त्यांच्या समाजहितोपयोगी मौलिक कार्याला तद्वतच खंबीर नेतृत्वाला वाढदिवसाच्या निमित्यानं मंगलमय मनोकामना व भरभरुन शुभेच्छा प्रदान करतो आहे.

       “येणारा प्रत्येक दिवस तुमच्या मनासारखा असावा,जीवनात तुमच्या कधी दुखाचा एक क्षणही नसावा….!

       मनात तुमच्या जे जे असेल ते-ते सर्व तुम्हाला मिळावे,प्रयत्नांना तुमच्या असेच यश मिळत रहावे….आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभावे….!

            प्रदिप रामटेके सर यांचा मनमोकळा स्वभाव आणि सगळ्यांशी अगदी नितांत प्रेमाने वागण्याची पद्धत,अगदीच विचारांचे मतभेद असणाऱ्या माणसांशीही अगदी जिवलगपणे मैत्रीचा हात पुढे करुन ऋणानुबंधाचे एकनिष्ठ नाते जोपासणारे,आपल्या सहकारी मीत्रांविषयी मुख्य संपादक रामटेके सर यांच्या मनातील वैचारिक आपलेपणा अगदी अतूट स्नेहभावाचा आणि जिव्हाळ्याचा आहे.आजच्या विज्ञानाच्या युगात कोंबडीच्या पिलालाही गरुडाचे पंख लावता येतील,पण भरारी घेण्याच वेड हे रक्‍तातच असावं लागतं,ज्यांच्या रक्‍तातच भरारी घेण्याचं वेड आहे असे आपले मुख्य संपादक…!

           काही माणसं स्वभावाने कशीही का असेनात मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात,अशा माणसांपैकीच एक म्हणजेच प्रदीपजी रामटेके सर !  

        आमचे प्रमुख मार्गदर्शक,प्रेरणास्थान आहेत.दूरदृष्टी ठेवून कार्यप्रणालीचा अवलंब करून सारासार व समर्पक विचार लिखाणातून मांडणारे उदयोन्मुख व्यक्तिमत्त्व प्रदर्शित करनारे मुख्य संपादक सर यांचे आयुष्य असेच सदोदित फुलत राहो,त्यांची वाटचाल सुजलाम् सुफलाम् होवून अविरत प्रफुल्लित होत राहो,त्यांची अनवरत भरभराट होवो.त्यांना असेच घवघवीत यश मिळत राहो,अशी,” दखल न्युज भारत,अन्वये संपादकीय संचालक मंडळ तथा दखल न्यूज परीवाराकडुन मंगलमय मनोकामना…! 

      शिखरे उत्कर्षाची सर तूम्ही करीत रहावी,कधी वळून पाहता माझी शुभेच्छा स्मरावी….

      तुम्हा दिर्घ आयुष्य लाभो ही मनस्वी सदिच्छा तथा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!..