Home Maharashtra आ.अभिजित वंजारी यांची धानोरा अभ्यासिकेला भेट… — विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून...

आ.अभिजित वंजारी यांची धानोरा अभ्यासिकेला भेट… — विद्यार्थ्यांशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या…

भाविकदास करमनकर 

तालुका प्रतिनिधी धानोरा 

        विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी मोहिमेच्या अनुषंगाने धानोरा दौऱ्यावर आलेले प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजित वंजारी यांनी नगरपंचायत अंतर्गत सुरु असलेल्या अभ्यासिकेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

         यावेळी त्यांनी स्पर्धा परीक्षा व विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी अभ्यास करणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांची विचारपूस करून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या.

      यानंतर त्यांनी तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पदवीधर मतदार नोंदणीबाबत मार्गदर्शन केले.तसेच जास्तीत जास्त पात्र पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन केले.

      धानोरा येथील प्राध्यापक,शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासोबतही त्यांनी सदिच्छा भेट घेऊन विविध स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली.पदवीधर मतदार नोंदणीचे महत्त्व,लोकशाही प्रक्रियेत सुशिक्षित मतदारांचा सहभाग आणि स्थानिक विकासाशी संबंधित विविध विषयांवर यावेळी सविस्तर संवाद साधण्यात आला.

       या प्रसंगी माजी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे,जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विश्वजीत कोवासे,प्राचार्य शमशेरखान पठाण,माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पोरेटी,तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत कोराम,नगरसेवक रमेश चौधरी,विनोद लेंगुरे,गोपीदास चौधरी,रवींद्र लेंगुरे,प्रभाकर उसेंडी,गणेश कुळमेथे,मेघराज वानखेडे,महिला तालुकाध्यक्ष शेवंताताई हलामी,नगराध्यक्षा पौर्णिमा सयाम,भूषण भैसारे,दीपक उसेंडी,शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल मशाखेत्री तसेच प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.