Home Maharashtra “12-13 जूनचं वादळ : आरमोरी सां.बा.वी.वाहन स्थळ उध्वस्त, लाखोंचा शेड जमीनदोस्त”…

“12-13 जूनचं वादळ : आरमोरी सां.बा.वी.वाहन स्थळ उध्वस्त, लाखोंचा शेड जमीनदोस्त”…

 लक्षवेधी 

ऋषी सहारे 

   संपादक 

आरमोरी : 12 व 13 जून रोजी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे आरमोरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाहन स्थळाचे शेड पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. दोन दिवस सुरू असलेल्या वादळामुळे शेडचे पत्रे उडून गेले. लोखंडी स्ट्रक्चर उभे असले तरी छताचा मोठा भाग उडाला आहे.

        शेडखाली पार्क केलेली सरकारी गाडी शाबूत आहे, पण पुढील पावसात सरकारी मालमत्तेचं काय होणार हा प्रश्न आहे. लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या शेडची वादळातच अशी अवस्था झाल्याने निकृष्ट दर्जाच्या कामाची शंका उपस्थित होत आहे.

        स्थानिक नागरिकांची मागणी : आरमोरी सां.बा.वी. अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून शेडची दुरुस्ती करावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी.