Home Maharashtra सातारा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…

सातारा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा…

शुभम गजभिये

  विशेष प्रतिनिधी

   पळसगांव :- चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा सातारा येथे शिवराज्याभिषेक दिन अत्यंत उत्साहात आणि प्रेरणायुक्त वातावरणात साजरा करण्यात आला.

          छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दैदिप्यमान इतिहासाला उजाळा देण्यासाठी या विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

     तत्वच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

          याप्रसंगी :- आदर्श गावांचे सरपंच गजानन गुळधे,काशीराम नन्नावरे (गु.से.मं अध्यक्ष),भाग्यवान ढोणे,(सार्व.स.म.अध्यक्ष),दिनेश कोडापे,(तं.मु.सदस्य),देवराव गायकवाड (प्रतिष्ठित नागरिक), आकाश चौधरी,रामकिशन सावसाकडे,समिर चौधरी,हरीश कोडापे,सुरज ढोणे,शेषराव जांभुळे,देवयानी शेडामे,वैष्णवी शेडामे यांच्यासह व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.