राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
आदिवासींच्या संविधानिक हक्कांचे संरक्षण,अस्मिता व ओळख जपण्यासाठी,तसेच विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी समस्त आदिवासी समाज संघटना कुरखेडा,आरमोरी,देसाईगंज,कोरची व धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ८ जून रोजी दुपारी १२ वाजता कुरखेडा उपविभागीय कार्यालयावर भव्य मोर्चा धडकणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व रामदास मसराम करणार असून त्यांनी सर्व आदिवासी बांधव,युवक,महिला,विद्यार्थी व समाजप्रेमींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
(आदिवासी अस्मिता,ओळख आणि अधिकारांसाठी एकजूट होऊया!)



