Home Crime अवैधपणे दारू तस्करी करणारे वाहन पकडले,आरोपी सह ४ लाख ५२ हजाराचा मूद्देमाल...

अवैधपणे दारू तस्करी करणारे वाहन पकडले,आरोपी सह ४ लाख ५२ हजाराचा मूद्देमाल जप्त…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         स्थानिक गून्हे शाखा गडचिरोली यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून कूरखेडा पोलीस स्टेशन व स्थानिक गून्हे शाखेचा चमूने आंधळी- खैरी मार्गावरील खैरी पांदन रस्त्याजवळ चारचाकी वाहनातून अवैधपणे देशी दारूची वाहतूक करणार्या वाहनाला सिनेस्टाईल पाठलाग करीत पकडले व आरोपीचा मूस्क्या आवळत १ लाख ५२ हजार ८८० रूपये कीमतीची २६ पेटी देशी दारू व ३ लाख रुपये किंमतीचे वाहन असा ४ लाख ५२ हजार ८८० रूपयाचा मूद्देमाल जप्त केला.

            माहिती नुसार शनिवार रोजी पहाटे ५ वाजेचा सूमारास कूरखेडा पोलीस स्टेशन व स्थानिक गून्हे शाखेचा संयुक्त चमूने सापळा रचला यावेळी आंधळी मार्गाने खैरी कडे एक पांढर्या रंगाचे चारचाकी वाहन क्र.सि जी ०४ एच सी ८९१८ संशयास्पद रित्या जात असल्याचे निदर्शनास येताच सदर वाहनाचा पोलीस पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करीत वाहन खैरी पांदन रस्त्याजवळ अडवत त्याची झडती घेतली.

        यावेळी वाहनात देशी दारूचा अवैध साठा आढळून आल्याने वाहन चालक आरोपी अकालसिंग संगतसिंग पटवा वय २७ रा.आंबेडकर वार्ड देसाईगंज याला अटक केली.सदर कारवाई ठाणेदार महेंद्र वाघ,स्थानिक गून्हे शाखा गडचिरोली येथील साहायक पोलीस निरीक्षक भरतसिगं गूल्लक, पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे ,पोलीस हवालदार शेखलाल मडावी, महिला पोलीस शिपाई अरूणा लोहबंरे यांचा चमूने केली. प्रकरणाचा पूढील तपास ठाणेदार महेंद्र वाघ यांचा मार्गदर्शनात हवालदार शेखलाल मडावी करीत आहेत. या कारवाईत गावकरयां चे सहकार्य लाभले.