दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादिका
नागभीड :- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले,महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव पांडवचे माजी सरपंच,श्रीगुरूदेव सेवा छात्रालयाचे अध्यक्ष डॉ.विठ्ठलराव बोरकुटे यांचे दि. ४ जून २०२६ ला सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले.ते ७५ वर्षाचे होते.
गत दोन दिवसांपूर्वी त्यांना नागपूर येथील रूग्णालयातून घरी आणण्यात आले होते.त्यांचे पच्छात ज्ञानेश्वर,कुणाल ही मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नागभीड तालुक्यातील चाहत्यांनी व प्रतिष्टीतांनी अंतदर्शन घेऊन शोक संवेदना व्यक्त केल्यात.
आज सकाळी ११ वाजता नवेगाव पांडव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
अंत्यसंस्काराला विदर्भातून श्रीगुरुदेव भक्तांचा जनसमुदाय येण्याची शक्यता असल्याने,डॉ.विठ्ठलराव बोरकुटे यांच्या अंत्ययात्रेला जनसागर असणार आहे.
प्रा.महेश पाणसे सर आणि दखल न्यूज भारत परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली!..


