Home Maharashtra प्रशासक सरपंचांचे राजीनामे चंद्रपूर जि.प.सिईओ यांनी तात्काळ मंजूर केले पाहिजे…

प्रशासक सरपंचांचे राजीनामे चंद्रपूर जि.प.सिईओ यांनी तात्काळ मंजूर केले पाहिजे…

        वृत्तवेध

     उपक्षम रामटेके

   मुख्य कार्यकारी संपादक

       कुठल्याही कारणास्तव ज्या प्रशासक सरपंचांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे राजीनामे दिले आहेत,त्यांचे राजीनामे तात्काळ मंजूर केले पाहिजे असे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचे म्हणणे आहे.

        यामुळे प्रशासक सरपंच का म्हणून राजीनामा देतात? याला विशेष महत्त्व देण्यापेक्षा,त्यांचे राजीनामे तात्काळ मंजूर करण्याला चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी प्रभावीपणे महत्व दिले पाहिजे.

     जेव्हा महत्त्वपूर्ण ग्रामसभा राहतात किंवा महत्त्वपूर्ण मासीक सभा राहतात,अशा वेळी राजीनामा देणारे सरपंच ग्रामसभेला व मासीक सभेला वारंवार दांडी मारतात असे जनमत आहे.

     जनमताचा कल लक्षात घेता,त्यांचा विश्वास प्रशानावर राहावा यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तथा संबंधित पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी राजीनामा देणाऱ्या सरपंचांना अजिबात संरक्षण देवू नये.

        अन्यथा प्रशासनच कामचुकार,कर्तव्यहिन सरपंचांना पाठीशी घालते असे होईल.म्हणूनच राजीनामे देणाऱ्या सरपंचांनी गय करता कामा नये,असेही संबंधीत गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

        याचबरोबर प्रशासक सरपंच जेव्हा आपल्या पदाचा राजीनामा देतात तेव्हा ते आपल्या लोककल्याणकारी कर्तव्याला व गाव विकास दायित्वाला महत्त्व देत नाही असे दिसून येते आहे.

          बऱ्याच ठिकाणी ग्रामपंचायत सरपंचांवर भ्रष्ट्राचारांचा आरोप झाले असताना,संबंधित ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,गटविकास अधिकारी हे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात असेही दिसून आले.

         यामुळे गावकऱ्यांचा समस्या वाढविण्यासाठी संबंधित ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,गटविकास अधिकारी हेच जबाबदार असतात अशी ओरड अनेक गावकऱ्यांची आहे.

       म्हणूनच राजीनामा देणाऱ्या सरपंचांना संरक्षण न देता त्यांना प्रभावीपणे पदमुक्त केले पाहिजे,या मताची जनता आहे.