राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला यांचा वतीने मागील सतत तिन वर्षांपासून शासकीय अनूदानीत, विना अनुदानित महाबिजचे संकरीत बियाणे पूरवठ्यात जिल्हात प्रथम क्रमांक प्राप्त करणार्या येथील कृषी औद्योगिक खरेदी विक्री सहकारी संस्थेचा नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देत सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शाशनाचा बियाणे महामंडळ अकोला अंतर्गत महाबिजचे अधिकृत पूरवठा धारक म्हणून येथील खरेदी विक्री सहकारी संस्था कार्यरत आहे संस्थेचा वतीने सन २०२३/२४,२४/२५ व २५/२६ या तिन हंगामात नियोजन बद्ध व्यवस्थापणाने शासकीय अनूदानीत,विना अनुदानित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात जिल्हात प्रथम क्रमांक प्राप्त केला त्यांचा या कामगीरीची दखल घेत महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अकोला यांचा वतीने नागपूर येथे नूकताच आयोजित कार्यक्रमात महामंडळाचे महाव्यवस्थापक विजयकुमार देशमुख यांचा हस्ते संस्थेचे अध्यक्ष व्यंकटी नागीलवार यांचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ तसेच सन्मानचिन्ह प्रमाणपत्र प्रदान करीत गौरव करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे व्यवस्थापक सूधाकर वैरागडे हे सूद्धा हजर होते.


