Home Social श्रीगुरूदेव भक्त डॉ.विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन….

श्रीगुरूदेव भक्त डॉ.विठ्ठलराव बोरकुटे यांचे निधन….

दिक्षा कऱ्हाडे

 वृत्त संपादिका

नागभीड :- वंदनीय तुकडोजी महाराज यांचे सहवासात ज्यांचे बालपण गेले,महाराजांच्या विचारांनी ज्यांनी आयुष्यभर निस्वार्थ पणे रुग्ण सेवा दिली असे नवेगाव पांडवचे माजी सरपंच,श्रीगुरूदेव सेवा छात्रालयाचे अध्यक्ष डॉ.विठ्ठलराव बोरकुटे यांचे दि. ४ जून ला सायंकाळी अल्प आजाराने निधन झाले.ते ७५ वर्षाचे होते.  

            गत दोन दिवसांपूर्वी त्यांना नागपूर येथील रूग्णालयातून घरी आणण्यात आले होते.त्यांचे पच्छात ज्ञानेश्वर,कुणाल ही मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. 

       त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच नागभीड तालुक्यातील चाहत्यांनी व प्रतिष्टीतांनी अंतदर्शन घेऊन शोक संवेदना व्यक्त केल्यात. 

     उद्या सकाळी ५ जुन २०२६ रोज शुक्रवारला ११ वाजता नवेगाव पांडव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येईल अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.