Home Maharashtra चुरमुरा येथील घर आगीत जळुन मोठे नुकसान… — आमदार रामदास मसराम...

चुरमुरा येथील घर आगीत जळुन मोठे नुकसान… — आमदार रामदास मसराम यांची घटनास्थळी भेट,पंचनाम्याचे दिले निर्देश…. — नुकसान भरपाईची मागणी…

      राकेश चव्हाण

तालुका प्रतिनिधी कुरखेडा…

        चुरमुरा येथे प्रदीप लहुजी कोपरे यांचे घर आगीत जळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळताच आमदार श्री.रामदासजी मसराम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. 

       यावेळी त्यांनी बाधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच प्रशासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

             घटनेची गंभीर दखल घेत आमदार श्री.रामदास मसराम यांनी आपत्कालीन विभाग,तसेच तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून तातडीने मदतकार्य व पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. 

       या आगीत घरातील जीवनावश्यक साहित्य,धान्य,कपडे तसेच इतर वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

               यावेळी धनपाल मिसार,मुखरू पाटील देशमुख,रवींद्र कांबळी,गुरु ताटपल्लीवार,शत्रुघ्न देशमुख,भूपेंद्र काळबांदे,संतोष कोरेकार,तसेच गावातील नागरिक व स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. 

       ग्रामस्थांनीही बाधित कुटुंबाला दैनंदिन वस्तू देत मदतीचा हात दिला व आवश्यक सहकार्य केले.