Home Maharashtra सती नदी काठावर रुग्णवाहिका धुळ खात का? जबाबदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार...

सती नदी काठावर रुग्णवाहिका धुळ खात का? जबाबदार संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का? :- नागरिकांचा सवाल…

    राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        सती नदी काठावरील वार्ड क्रमांक १६ मधील पाण्याच्या टाकीजवळ MH 33T 3042 क्रमांकाची रुग्णवाहिका अनेक दिवसांपासून धूळ खात पडून असल्याचे चित्र समोर आले आहे.

        एका बाजूला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने गेवर्धा येथील चिमुकल्याचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडते, तर दुसऱ्या बाजूला शासन निधीतून आणलेली रुग्णवाहिका वापराविना उभी असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांचा प्रश्न आहे…

या रुग्णवाहिकेची जबाबदारी नेमकी कोणाची?
ती कोणत्या रुग्णालय अथवा संस्थेच्या ताब्यात आहे?
रुग्णसेवेसाठी असलेली ही सुविधा बंद अवस्थेत का पडून आहे?

        संबंधित प्रशासन, आरोग्य विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची तात्काळ दखल घेऊन चौकशी करावी, व बेजबाबदार कर्मचाऱ्यां वर कठोर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.