Home Maharashtra “विश्र्वासच बसत नाही,चिमूर व भिसी पोलिस कर्तव्य पार पाडू लागलीत? —...

“विश्र्वासच बसत नाही,चिमूर व भिसी पोलिस कर्तव्य पार पाडू लागलीत? — चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक बदलताच शांत बसलेले कर्तव्यहिन पोलिस अधिकारी सक्रिय झाले काय? — महसूल अधिकारी केव्हा झोपेतून जागे होणार? — अवैध सट्टा व्येवसाय,अवैध दारु विक्री व्येवसाय,अवैध मुरुम व वाळू उत्खनन व्येवसाय आणि वेश्याव्यवसायाकडे अजूनही पोलिसांच्या नजरा वळलेल्या नाहीत….

 रोखठोक

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

        चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून आयुष नेपानी यांनी पद आणि कर्तव्याची सुत्रे हातात घेताच चंद्रपूर जिल्हातंर्गत चुप बसणारे कर्तव्यहिन पोलिस अधिकारी कामाला लागले अल्याचे दिसून येत आहे.

           पण,हेच ते कर्तव्यहिन,कामचुकार,अवैध व्येवशायाकडे दुर्लक्ष करणारे आणि सर्व प्रकारच्या अवैध धंदेवाईकांना संरक्षण देणारे पोलिस अधिकारी,हे अचानक कर्तव्य पार पाडू लागलीत आणि कर्तव्यातंर्गत सक्रिय झालीत,”यावर,विश्वासच बसत नाही!

        चिमूर तालुक्यात शेकडो वाळू माफिया आहेत तर एम.के.एस.कंपनीसह अनेक मुरुम माफीया आहेत.जे १०० ब्रास लिज अंतर्गत २ ते ३ हजार मुरुमाचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात करताहेत.

            तद्वतच दररोज हजारो ब्रास वाळूचे अवैध उत्खनन करणारे शेकडो वाळू माफिया व काही मुरुम माफीया चिमूर तालुक्यात सक्रिय आहेत.मुरुम व वाळू माफियांना ब्र बोलण्याची हिंमत न दाखवणारे चिमूर तालुक्यातील पोलिस अधिकारी अचानक त्यांचे ट्रॅक्टर रेतीसह जप्त करु लागलीत आणि ट्रॅक्टर मालकासह चालकांवर फौजदारी कारवाई करु लागलीत,अवैध वेश्याव्यवसाय करणा-यांकडे नजरा फिरवू लागली व त्यांच्यावर फौजदारी कारवाई करु लागलीत,कत्तलीसाठी जनावरे नेणाऱ्यांची पिकअप अडवू लागलीत व फौजदारी कारवाई करु लागलीत,हे कसे काय शक्य होत आहे?

       “होय,हे शक्य होत आहे नवीन जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नेपानी रुजू झाल्यामुळेच!…

           पण,चिमूर तालुक्यातील खेड्यापाड्यात देशी दारुचा अवैध पुरवठा करणारे पाच माफिया सक्रीय आहेत.यात राजकीय पक्षांचे धुरंधर सुध्दा आहेत.हे धुरंधर संघटीत गुन्हेगारीला खुलेआम प्रोत्साहन देत असल्याने या धुरंधरांवर मकोका अंतर्गत कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांचे आहे.

       मात्र,वडाळा (पैकू),भिसी,शंकरपूर,मोटेगाव येथील देशी दारुचा अवैध पुरवठा करणारे माफीया चिमूर व भिसी पोलिसांच्या हाती लागणार काय?हा प्रश्न अधिकच गंभीर आहे.

          याचबरोबर चिमूर तालुक्यात सट्टा व्यवसायाचे जाळे जिकडे-तिकडे पसरली आहेत.याकडे स्थानिक पोलिस विभागाचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करताहेत.

       तद्वतच चिमूर शहरात अनेक ठिकाणी वेश्याव्यवसाय सुरु असल्याच्या खमंग चर्चा असताना,त्याकडे ठाणेदार हे दुर्लक्ष करतात,हे यापूर्वीच्या घटनाक्रमावरुन लक्षात आले आहे.त्यांनी यापुर्वीच वेश्याव्यवसाय करणा-यांवर मोठी कारवाई करणे अपेक्षित होते,परंतु तसे त्यांनी केले नाही.

         तद्वतच चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू व मूरुम माफीया सक्रिय आहेत.डोळ्यादेखत अवैध उत्खननातंर्गत ट्रक,हायवा,ट्रॅक्टर आवागमन करीत असताना,महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी पुर्णतः दुर्लक्ष करतात हे शतप्रतिशत सत्य आहे.

           अवैध वाळू वाहतूकीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्याचे कारण काय?,”याची उकल जिल्हा पोलिस अधीक्षकांनी करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांचे आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करणार?…..

      चिमूर तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे जोमाने सुरू आहेत.हे सर्व धंदे बंद झाले पाहिजेत असे नागरिकांचे म्हणणे आहे.

       चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हे चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करतील अशी अपेक्षा चिमूर तालुक्यातील नागरिकांना आहे.

        पण,ते चिमूर तालुक्यातील अवैध धंदे मुळासकट बंद करण्यासाठी यशस्वी होतील काय? हा प्रश्न अधिकच चिंताजनक आहे.