ऋषी सहारे
संपादक
आरमोरी : नगरपरिषद आरमोरी यांच्या वतीने दिनांक 16 मे 2026 रोजी प्रत्यक्ष जनगणना कार्यास उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात करण्यात आली. नगरपरिषद क्षेत्रामध्ये एकूण 44 HLB निश्चित करण्यात आले असून सर्व 44 HLB मध्ये जनगणना कार्य राबविण्यात येणार आहे. या कार्यासाठी 7 पर्यवेक्षक तसेच 44 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
जनगणना कार्याच्या प्रारंभी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जनगणना कार्यातील अचूकता, नागरिकांशी समन्वय तसेच सेल्फ एन्युमरेशन संदर्भातील माहिती देण्यात आली.
यामध्ये श्री. एच. एस. निखारे यांनी HLB क्रमांक 27 मध्ये प्रभावी जनजागृती करून जवळपास 100 नागरिकांकडून सेल्फ एन्युमरेशन पूर्ण करून घेतले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत नगरपरिषद आरमोरी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
यानंतर सर्व प्रगणकांना जनगणना कार्यासंदर्भातील काही मूलभूत सूचना व मार्गदर्शन देण्यात आले. नागरिकांनीही जनगणना कार्यास सहकार्य करून अचूक माहिती द्यावी, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


