लक्षवेधी
राकेश चव्हाण
तालुका प्रतिनिधी कुरखेडा..
आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव परिसरात लागलेल्या वनव्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.शेतात काढून ठेवलेला मका तसेच जमा करून ठेवलेले मका पूंजने आगीत जळून खाक झाले.
यासोबतच शेतकऱ्यांचे मोटार पंप,पाण्याचे पंप,डीपी तसेच शेतीसाठी वापरण्यात येणारे इतर साहित्यही आगीत जळून नुकसान झाले आहे.अचानक लागलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.

तसेच परिसरातील भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले असून आंब्याची झाडे जळून खाक झाली.झाडांना लागलेली पिकलेली आंब्याची फळे सुद्धा आगीत जळाली.
यासोबतच फणसाची झाडे व झाडांना लागलेले फणसही जळून नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
या सर्व नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी आमदार श्री.रामदास मसराम यांनी तलाठी कात्रटवार यांना सोबत घेऊन शेतशिवारात फिरून केली.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच संबंधित प्रशासनाला त्वरित पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याच्या सूचना दिल्या.
आमदार श्री.रामदास मसराम यांनी शासनाकडे नुकसान भरपाईसाठी पाठपुरावा करण्यात येईल व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील,असे आश्वासन दिले.
यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,धनपालजी मिसार,राजूभाऊ सामृतवार,तलाठी कात्रटवार,विनोद बारस्कर,किशोर तोरणकर,हरिदास भुरसे,विकी जूआरे,कैलास भुरसे,मंगेश जूआरे,संजय बारस्कर,ओमप्रकाश बारस्कर,सिकंदर नंदधने,जितेंद्र सोनटके,विजय कत्रे,अक्षय लोथे,भूषण चिचगरे,गीतेश उपरीकर,नाशिक भुरसे,अमर उपरीकर,आकाश खोब्रागडे,अजय नारनवरे,प्रफुल नारनवरे,रोशन लक्षणे,अंशीक लोणारे,प्रज्वल प्रधान,प्रज्वल नैताम,जगदीश लक्षणे,ईशांत लढे,निकेश नंदधने,सुमित नंदधने,तसेच परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


