Home Maharashtra “प्रभाग ०९ मधील नागरिकांना आधुनिक सुविधा देण्यासाठी ‘नमो उद्यान’ महत्त्वपूर्ण ठरणार” :-...

“प्रभाग ०९ मधील नागरिकांना आधुनिक सुविधा देण्यासाठी ‘नमो उद्यान’ महत्त्वपूर्ण ठरणार” :- नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : “आळंदी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रभाग क्र. ०९ मधील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी सुमारे १ कोटी रुपये खर्चातून ‘नमो उद्यान’ उभारण्यात येत आहे. या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था, मुलांसाठी सुरक्षित खेळणी, महिलांसाठी फिरण्याचा ट्रॅक तसेच युवकांसाठी व्यायामाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असून हे उद्यान नागरिकांच्या आरोग्यदायी आणि आनंदी जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे,” असे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी केले.

        आळंदी नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ०९ मध्ये नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुमारे १ कोटी रुपये खर्चाच्या “नमो उद्यान” चे भूमिपूजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे भूमिपूजन नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

        यावेळी मुख्याधिकारी माधव खांडेकर, उपनगराध्यक्षा सुजाता तापकीर, सभागृह नेते सचिन गिलबिले, स्थानिक नगरसेवक दिनेश घुले, नगरसेविका अर्चना तापकीर, नगरसेवक सोमनाथ कुऱ्हाडे, गोविंदा कुऱ्हाडे, रामचंद्र भोसले, सागर कुऱ्हाडे, सुरेश झोंबाडे, नगरसेविका उज्वला काळे, माजी नगरसेवक प्रदीप बवले, अनिकेत तापकीर, कालिदास तापकीर, सुदर्शन चौधरी, रोहन पवार, गणेश कोकाटे, सारंग तापकीर, नवनाथ थोरवे, माऊली धुले तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        स्थानिक नगरसेवक दिनेश घुले यांनी आपल्या मनोगतात प्रभागातील नागरिकांना विरंगुळा, व्यायाम आणि मुलांसाठी सुरक्षित खेळण्याची जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे उद्यान उभारण्यात येत असल्याचे सांगितले. नागरिकांच्या मागणीनुसार हा विकास प्रकल्प साकारत असल्याचे त्यांनी नमूद केले.