राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
तालूक्यातील मौशी येथील तेंदूपत्ता संकलन करण्याकरिता गावाजवळील जगंलात गेलेल्या महिला मजूराला रानडूकराने हल्ला करीत गंभीर जखमी केल्याची घटना दि. १२ मे रोजी सकाळचा सूमारास घडली.जखमी महिलेचा नाव विद्या ताराचंद चांभारे वय ३५ असे आहे
तालूक्यात तेंदूपत्ता हंगाम जोमात सुरू आहे सकाळचा सूमारास मजूर तेंदूपत्ता संकलन करीता जगंलात जातात आज सकाळी मौशी येथील काही महिला पूरूष मजूर गावानजीक असलेल्या जगंलात तेंदूपत्ता संकलन करताना रानडूकराने विद्या चांभारे यांचावर हल्ला चढविला यावेळी सोबत असलेल्या मजूरानी मदतीकरीता धाव घेतल्याने रानडूकराने जगंलाचा दिशेने पळ काढला जखमी महिलेला तातडीने उपजिल्हा रुग्णालय कूरखेडा येथे दाखल करण्यात आले.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच आमदार रामदास मसराम व रूग्न कल्याण समिती सदस्य जयंत पाटील हरडे यांनी रूग्णालयात पोहचत जखमी महिलेची भेट घेत उपचाराची काळजी घेण्याची सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांना केली व वनविभागाचा अधिकार्यांशी संपर्क करीत तातडीने जखमी महिलेला आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले.
या प्रसंगी माजी सभापति परसराम टिकले,माजी जि.प.सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापति श्रीराम दुगा,गिरीधर तितराम,सामजिक कार्यकर्ते धनपाल मिसार,उस्मान पठाण,भावेश मुंगणकर,राकेश चव्हाण,कमलेश बारस्कर सह कार्यकर्ते उपस्थित होते.



