Home Maharashtra पाण्या अभावी कृषी चिकित्सालय रोपवाटिका धोक्यात…

पाण्या अभावी कृषी चिकित्सालय रोपवाटिका धोक्यात…

   लक्षवेधी

  राकेश चव्हाण 

तालुका प्रतिनिधी कुरखेडा..

      कुरखेडा तालुक्यातील रामगड (पुराडा) येथील कृषी चिकित्सालय रोपवाटिका सध्या पाण्या अभावी आणि मोकाट गुरांच्या त्रासामुळे संकटात सापडली आहे. 

      लाखो रुपयांचा खर्च करून तयार करण्यात आलेल्या रोपवाटिकेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

                                    रोपवाटिकेत विविध प्रकारची वनस्पती व फळझाडांची रोपे तयार करण्यात आली आहेत.मात्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा, नियमित पाणीपुरवठ्याचा अभाव आणि संरक्षणासाठी योग्य कुंपण नसल्याने अनेक रोपे सुकण्याच्या मार्गावर आहेत. 

         मोकाट गुरे रोपवाटिकेत शिरून रोपांचे नुकसान करत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.रोपवाटिकेच्या परिसरातील फलक गंजलेल्या अवस्थेत असून देखभालीअभावी संपूर्ण परिसर ओसाड दिसत आहे. 

                                     शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन उपक्रमाला यामुळे फटका बसत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.स्थानिक नागरिकांनी संबंधित कृषी विभागाने तातडीने लक्ष देऊन पाणीपुरवठा,संरक्षक कुंपण व नियमित देखभालीची व्यवस्था करावी,अशी मागणी नागरिकानी केली आहे.