Home Crime प्रतिष्ठीत व्यापाऱ्यानी केली धान व्यापाऱ्यांची ८५ लाखांची फसवणूक…

प्रतिष्ठीत व्यापाऱ्यानी केली धान व्यापाऱ्यांची ८५ लाखांची फसवणूक…

ऋषी सहारे 

    संपादक 

 आरमोरी :- एका नामांकित कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगून दिनेश जुवारे व ८ सहकारी व्यापाऱ्यांन सोबत धान्य खरेदीचा सौदा करण्यात आला. एकूण ८०,७०,६८२ /- रक्कमेचा धान्याची खरेदी करण्यात येवून तसी रीतसर खरेदी बील पावती देण्यात आली.

        या नंतर धान्य विक्री केलेल्या व्यापाऱ्यांनी आपली वसुली रक्कम मिळण्यासाठी मागणी केली असता वारंवार टाळाटाळ करु लागले. शेवटी त्रासून व्यापाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता तीघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

          फिर्यादी नामे ठाणेगाव येथील दिनेश ट्रेडिंग कंपनीचे मालक दिनेश पुंडलिक जुवारे वय ४२ वर्षे,व्यवसाय धान्य खरेदी, अधिक ८ धान्य सहकारी व्यापारी यांचे कडून दि.७/४/२०२५ ला बाजार रोड लगत जनता राईस मिल येथे भारत ऍग्रो व सनराइज ऍग्रो कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे भासवून आरोपी आरमोरी नगरपरिषदचे माजी नगरसेवक हैदरभाई हुसैनभाई पंजवानी ,वय ६८ वर्षे ,अहमद हैदरभाई पंजवानी वय ३५ वर्षे रा आरमोरी, व पियुष राजकुमार दिंवानका वय ३२ वर्षे रा.प्लाट नं.१३८१ पुष्कराज देशपांडे लेआऊट, वर्धापन नगर, भांडेवाडी, नागपूर यांनी संगनमत करून असा एकूण ८०,७०,६८१ रुपयांचे धान्य खरेदी करून रीतसर खरेदी बील पावती दिली.

          या नंतर दिनेश जुवारे अधिक ८ सहकारी धान्य व्यापारी यांनी खरेदी केलेल्या धान्याची नमुद रक्कम मिळण्याबाबत वारंवार मागणी केली असता आरोपी रक्कम देण्यास नेहमीच टाळाटाळ करु लागले.शेवटी त्रासून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.असे फिर्यादीच्या फिर्यादी वरुन सदर गुन्हा नोंद करून तीघाही आरोपी विरोधात दि. २४/४/२०२६ ला भा.न्या.सं.प्रमाणे कलम ३१६ ( ५ ) ,३ ( ५ ) गुन्हा नोंद केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास गवते यांचे मार्गदर्शनात अधिक तपास पोउपनि दिलीप मोहूर्ले करीत आहेत.