राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधि
कूरखेडा तालुका अंतर्गत पुराडा पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करत काल दि.२३ ला मौजा येंगलखेडा ते मालेवाडा रोडवर असलेल्या पान टपरी मधील दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. या धडक कारवाईत पोलिसांनी देशी विदेशी व हातभट्टी मोहफुलची दारू असा एकूण ४४६००/- रु. चा मुद्देमाल आरोपींचे ताब्यातून हस्तगत केला आहे.
प्रभारी अधिकारी स.पो.नी. रविंद्र म्हैसकर यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, आरोपी श्रीकांत सहारे हा त्याचा येगलखेडा ते मालेवाडा रोडवर असलेल्या पान टपरीमध्ये अवैध्य रित्या देशी विदेशी व हातभट्टी मोहफुलची दारू विक्री करीत आहे.
असून परिसरातील नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत उप विभागीय पोलिस अधिकारी रविंद्र भोसले यांचे मार्गदर्शना खाली सपोनि.रविंद्र म्हैसकर, सहाय्यक पोलिस उप निरीक्षक, दल्लूराम उईके, बापूजी सयाम, पोहवा, गंगाधर कोटनाके, पोलिस अंमलदार, पंकज बारसागडे, धनराज उईके, लक्ष्मी पाल, यांनी दुपारच्या सुमारास मौजा येंगलखेडा ते मालेवाडा रोड वरील पान टपरीवर छापा टाकुन देशी विदेशी व हातभट्टी महाफुलची दारू असा एकूण ४४६००/- रु. चा मुद्देमाल पोलिसांनी आरोपीचे ताब्यातून जप्त केला व आरोपींविरुद्ध पुराडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारू बंदी कायद्याच्या कलम ६५(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



