प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
अयोग्य हेतू अंतर्गत मानसामानसामध्ये (लोकांमध्ये) द्वेष पसरवणे ही एक अत्यंत घातक सामाजिक मानसिक विकृती आहे,जी समाजाचे ऐक्य नष्ट करतय.
अलिकडे राजकीय आणि जातीय भाष्य करताना काही नेत्यांकडून किंवा मोठ्या व्यक्तींकडून दुसऱ्या समुदायाविरुद्ध वारंवार अपमानजनक टीका केली जाते,ज्यामुळे समाजासमाजात व मानसामानसात द्वेष निर्माण होत असल्याचे दिसून आले.
तद्वतच धार्मिक कट्टरता दाखवताना इतर धर्मियांबद्दल द्वेषपूर्ण गोष्टी सातत्याने पसरवणे हा एक सुनियोजित कटाचा व छडयंत्राचा भाग दिसतो आहे.
द्वेषामुळे समाजासमाजात,माणसामाणसात नेहमी तेढ तर निर्माण होतोय,पण माणसांचे डोके भडकावून ठेवत फक्त राजकीय फायदा करुन घेणे हाच उद्देश यामागचा दिसतोय.
याचबरोबर वारंवार द्वेषपुर्ण वक्तव्य करुन विशिष्ट समाज वर्गाच्या हितासाठी,स्वत:च्याच समाजाचे नुकसान करणे हा एक गलिच्छ असा सुनियोजित प्रकार दिसतो आहे.
द्वेष करणे ही एक मोठी मानसिक विकृती आहे,जी द्वेष करणाऱ्याचेच सर्वात जास्त नुकसान करते.पण,समाज मनावर त्या वक्तींच्या विषवल्ली द्वेषाचे घातक परिणाम पडतात आणि ते परिणाम भारत देशातील सर्व समाजाचे अतोनात नुकसान करतात हे एक सत्य आहे.
द्वेष कार्यपध्दतीमुळे सामाजिक अस्थिरता निर्माण तर होतेच,पण यामुळे समाजातील सलोखा नष्ट होतो,दंगली व हिंसक घटना घडवून आणली जातात आणि यामाध्यमातून माणसामाणसात अविश्वासाचे वातावरण निर्माण केले जाते.
द्वेषपूर्ण भाषणांमुळे एखाद्या समुदायाला अपमानित केले जाते आणि त्यांच्यात नेतृत्वहीनता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय.हे वास्तव भारत देशातील लोकांना गुलाम बनविणारे ठरु शकते,याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
कायदेशीर आणि नैतिक बाजू समजून घेतली तर
न्यायपालिकेचे सुध्दा द्वेष पसरविणाऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकदा द्वेषपूर्ण भाषणांच्या तक्रारींकडे पोलीस किंवा प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसून आले आहे.ज्यामुळे द्वेष पसरवणाऱ्यांचे धैर्य वाढत आहे.
समाजासमाजात द्वेषातंर्गत अप्रिय भावना पसरविणे हा देशद्रोह आहे.याचबरोबर द्वेष ही अनैतिक भावना आहे,जी मनुष्याला विनाशाकडे नेते.
अयोग्य,तत्वहिन,अवास्तव, भाषणांचा कायदेशीर मार्गाने निषेध करणे गरजेचे आहे आणि समाजात बंधुता आणि प्रेमाचा संदेश पसरवणे अत्यावश्यक आहे.
थोडक्यात सांगायचे तर,द्वेष पसरवणे हे समाजाच्या मुळावर घाव घालणारे कृत्य आहे.हे एका मानसिक आजारासारखे आहे,ज्यापासून समाजाने सावध राहणे आवश्यक आहे.क्रोधाची भावना म्हणजे द्वेष होय हे भारतातील नागरिकांनी वेळीच समजून घेतले पाहिजे.
अजूनही वर्णव्येवस्थेच्या,
जातीव्येवस्थेच्या,धर्मव्येवस्थेच्या द्वेषाचे मूळ काही विशिष्ट लोकांच्या नैतिक किंवा वैचारिक विश्वासांवर आधारित असल्याने इतरांबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन किंवा सहानुभूती त्यांच्यात दिसत नाही.यामुळे संभाव्यतः यातूनच हिंसक प्रेरणांना चालना मिळते,हे एक वास्तव आहे.
द्वेषाची मूळ कारणे काय आहेत तर द्वेष हा सत्ता आणि नियंत्रणाच्या मुद्द्यांवर आधारित असतो.
आजचे राजकीय आणि सामाजिक चित्र बघितले तर, “बहुजन समाजातील लोकांवर सत्ता करण्यासाठी आणि बहुजन समाजातील लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्ता असायला पाहिजे या कल्पनेतून काही राजकीय व धार्मिक लोकांकडून द्वेष निर्माण केला जातोय.
द्वेष’ म्हणजे दुसऱ्यांच्या विरोधात अकारण,चुकीच्या कार्यपध्दती नुसार,जाणिवपूर्वक,हेतूपुरस्सर, मत्सर, हेवा,तिरस्कार,आकस,वैर आणि जळफळाट करणे होय.अशा विकृतीमुळेच एकमेकांचा राग,एकमेकांची ईर्ष्या,करण्यासाठी वाव मिळतो हे आजच्या काळातले राजकीय व सामाजिक चित्र आहे.
हेट द्वारे ‘तिरस्कार करणे’, ‘घृणा करणे’, ‘तिरस्कार करणे’ आणि ‘तिरस्कार वाटणे’,या सर्व शब्दांचा अर्थ, ‘एखाद्या गोष्टीबद्दल तीव्र नापसंती किंवा तीव्र तिरस्कार वाटणे’ असा असला तरी, हेट’ या शब्दात अनेकदा वैर किंवा दुष्टपणासोबत असलेली भावनिक नापसंती अभिप्रेत असते.
मानवद्वेषी म्हणजे अशी व्यक्ती जिने इतर लोकांचा द्वेष करणे होय.ही सर्वसाधारण सवय किंवा सर्वसाधारण अवस्था काही विशिष्ट वर्गाच्या लोकांनी बनवली आहे.मानवद्वेषी व्यक्तीची व्याख्या अशी केली जाते की,ती मानवजातीबद्दल सर्वसाधारण नापसंती आणि अविश्वासाच्या भावनांनी युक्त असते.
‘विकृती’ आणि ‘लोकांचे नुकसान’ याला अनुसरून शारीरिक,मानसिक आणि लैंगिक विकृतींचा समावेश होतो.ज्याचा भारतीय समाजावर आणि भारत देशातील करोडो व्यक्तींवर गंभीर परिणाम होत आहे.
द्वेषातंर्गत सार्वजनिक ठिकाणी लैंगिक अवयव दाखवून असभ्य वर्तन करणे.बलात्कार आणि संमतीशिवाय लैंगिक जबरदस्ती करणे,ज्यामुळे पीडितेचे शारीरिक व मानसिक आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहेत.
याचबरोबर द्वेष अंतर्गत अनिश्चित वर्तन,भ्रम आणि सामाजिक संवादात अडथळे आणण्याच्या,घटनांमुळे रुग्णांसह लोकांचे जीवनमान कमी होत असल्याचे वास्तव निदर्शनास आले आहे.
द्वेष कार्यपध्दतीमुळे नागरिकांना कायमचे अपंगत्व येणे,अवयव निकामी होणे,जुनाट आजार उत्पन्न होणे,आणि मृत्यू होणे असेही प्रकार घडले आहेत.
तद्वतच द्वेषामुळे चिंता वाढणे,मनात नैराश्य पसरणे,मानसिक संतुलन बिघडणे,मनात न्यूनगंड तयार होणे.सामाजिक आणि आर्थिक नुकसान होणे,कौटुंबिक कलह वाढणे,सामाजिक बहिष्कार टाकणे,असे प्रकार घडताना दिसत आहेत.
उपाय….
द्वेष पसरविण्याचे काम करणाऱ्या विकृती वर एकच उपाय आहे!,”तो म्हणजे लोकांना योग्य विचारातंर्गत व योग्य भुमिका अंतर्गत जागरुक करणे,समजदार बनविने!..
समाजासमाजातील नागरिकांना भांडणात अडकून ठेवीत त्याच नागरिकांचे अधिकार-हक्क नाकारणाऱ्या,द्वेष विकृतीला वेळेत ठेचून काढले पाहिजे,यातच देशाचे व देशातील नागरिकांचे हित आहे…



