Home Crime गांजा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा वर्धाची धडक कारवाई…

गांजा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखा वर्धाची धडक कारवाई…

सैय्यद जाकिर 

  उपसंपादक..

दखल न्यूज भारत..

     गत दि18अप्रैल रोजी स्था. गु.की.शा.वर्धा चे पथक उपविभाग हिगनघाट परिसरात पेट्रोलिंग करित अस्ताना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहिती वरुण पुलिस स्टेशन समुद्रपुर येथे कमलाकर चिंतामन वावधने यांचे रहते घरी एन.डी.पी.एस. कायद्यान्वये रेड केला.

       गुन्हेगार हे गांजा अमली पदार्थांची विक्री करताना मोक्याच्या ठिकाणी आढळून आल्याने तत्सबंधाने मोका स्थळाचा जपती पंचनामा केला व कारवाई केली.

      आरोपीच्या ताब्यातून 02 किलो 157 ग्राम गांजा अमली पदार्थ जप्त करीत,गांजा मालाची वाहतुकी करीता वापरलेली प्रो.कंपनी ची मोटर सायकल क्र.एम.एच.32,ए.एम.1627 व मोबाईल सह जु.नी.की.1 लाख 34 हजार 775 रू.चा मुद्देमाल जप्त केला.

        आरोपी व त्यास गांजा माल पूरवठा करनारा आरोपी नामे शेख अलीम शेख रमज़ान रा.मोठा ताजबाग जवळ आदर्श नगर नागपुर,असे दोघा विरुद्ध पुलीस स्टेशन समुद्रपुर येथे ए.डी.पी.एस.कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

        सदरची कारवाई पुलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल,अप्पर पुलिस अधिक्षक सदाशिव वाघमारे,यांचे निर्देशाप्रमाणे स्थानीय गुनहे शाखा जि.वर्धा चे पुलिस निरीक्षक विनोद चौधरी,पो.उप.नी.प्रकाश लसुनते,पो.अ.अरविंद येनुरकर,रोशन निंबो डकर,रवि पुरोहित,अक्षय राऊत,दिनेश बोथकर,अभिषेक नाईक,सर्व नेमनुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.