Home Maharashtra पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर परिसरातील शेतकऱ्यासह उद्योजक संतप्त… — भारनियमनाची संध्याकाळची...

पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपुर परिसरातील शेतकऱ्यासह उद्योजक संतप्त… — भारनियमनाची संध्याकाळची वेळ बदलण्याची मागणी… — संध्याकाळी सहा ते दहा चार तासा पैकी कपात करून दिवसा दोन तास करण्यात यावे…

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी 

       बदलत्या वातावरणा बरोबर इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपरी बुद्रुक ते नरसिंहपूर परिसरात संध्याकाळी 6 ते 10 भारनियम असल्यामुळे उद्योजक व शेतकऱ्यांच्या डोक्यावर टाकल्यामुळे महावितरण विभागाचे वातावरण देखील बदलले आहे. याचा फटका ग्रामीण भागातील उद्योग धंदे व सर्वसामान्य जनतेसोबतच शेतकऱ्यांनाही बसू लागला आहे.

          नरसिंहपुर, पिंपरी बुद्रुक, टणु ,गिरवी, गणेशवाडी, शिंदेवस्ती, चव्हाण वस्ती, सुतार वस्ती, ओझरे, गोंदी, लुमेवाडी, लिंबुडी, अशा या भागांतील शेतकऱ्यांवर संध्याकाळी सहा ते रात्री दहा या चार तासांचा भारनियमन महावितरण विभागाने लादले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत गावठाण क्षेत्रातील नागरिकांना घरी विजेचा पुरवठा उपलब्ध नाही, मात्र शेतकऱ्यांच्या घरी अंधार आहे.

         दिवसभर काबाडकष्ट करणारा शेतकरी रात्री थकून घरी येतो, तेव्हा त्याची मुले अंधारात अभ्यास करू शकत नाहीत. संध्याकाळच्या वेळी शेतातील जनावरांच्या गोठ्यातही काम करू शकत नाहीत. डासांचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शेतकरी दररोज निराश अवस्थेत घराबाहेर बसू लागले आहेत. दररोजच्या या लोडशेडिंगच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन नीरा व भिमा नदीकाठच्या गावातील संध्याकाळी सहा ते रात्री दहा या चार तासांचा भारनियमन महावितरण विभागाने रद्द करण्यात यावे अशी तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

          तालुक्याच्या पूर्व भागातील टणु यथील 3311 केवी सब स्टेशन व पिंपरी बुद्रुक येथील 33/11 केवी सब स्टेशन या दोन सब स्टेशन मधील संध्याकाळचे भारनियमन रद्द करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून, छोटे मोठे व्यावसायिक, उद्योजक यांच्या कडून मागणी करण्यात आलेली आहे.

         रात्री अंधाराचा फायदा घेऊन गावातील घरामधील चोऱ्या व नदी काठावरील विद्युत पंप तसेच विहीर व बोर येथील विद्युत पंप सह केबल्स चोरून नेण्याचा प्रकार वाढलेला आहे.

        सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा काळ सुरू असल्याने सहा ते दहा या चार तासाच्या वेळेत रात्री अंधार आसल्यामुळे गोर गरीब व गरजू शेतकऱ्यांच्या मुलांना अभ्यास करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. 

        याबाबत संध्याकाळचे चार ते दहा हे लोड सेडीग दिवस पाळीला करण्यात यावे अशी मागणी या भागातील सर्व शेतकरी बांधव, छोटे मोठे व्यावसायिक, व उद्योजक सह ग्रामस्थ त्यांच्याकडून भारनियमनाच्या वेळेत बदल करावा अशी मागणी होत आहे. 

        भारनियमनामध्ये कपात करून चार तासा ऐवजी दोन तास करण्यात यावे व भारनियमनाची वेळ बदलून रात्री ऐवजी दिवसा ठेवावी अशी मागणीही केली आहे.

     शेतकरी बळीराजाच्या हाकेला महावितरण विभाग धावून येईल का? संध्याकाळी चार तासांचे भारनियमन करण्या ऐवजी दिवसा दोन तास भारनियमन करून शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? हा प्रश्न सध्यातरी उपस्थित आहे.

          महाराष्ट्राचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूर तालुका हा बालेकिल्ला असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या या व्यथेकडे लक्ष देऊन महावितरण विभागाला भारनियमन रद्द करावे.

         रात्री ऐवजी दिवसा दोन तास भारनियमन करावे अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.