आपल्या भारत देशात विषमतेची आणि विषमतावादी व्यवस्था आहे, या व्यवस्थेचे संरक्षण करण्यासाठी म्हणून सत्ताही विषमतावादी नेतृत्वाकडेच आहे.
आपल्या भारत देशात जमीनदारी आणि भांडवलदारी मोठ्या प्रमाणात आहे, म्हणून नेतृत्व हे जमीनदार आणि भांडवलदार यांचे कडेच आहे.
आपल्या भारत देशात जातीय व्यवस्था आणि धर्म व्यवस्था आहे, भारतातील बहुसंख्य मतदार हे जातीयवादी आणि धर्मांध आहेत, म्हणून ते जातीयवादी आणि धर्मांध लोकप्रतिनिधीच निवडून देत असतात.
आपल्या भारत देशात जमीनदारी आणि भांडवलदारी व्यवस्था असल्यामुळे, इथे गरीब मध्यम श्रीमंत असे वर्ग आहेत. आणि जातीचे पण प्रवर्ग आहेत. म्हणजेच भारतीय व्यवस्था ही जातीय प्रवर्गीय धर्मीय आणि वर्गीय आहे, म्हणजेच भारतीय व्यवस्था ही आर्थिक विषमता आणि सामाजिक व्यवस्थाची घडी असलेली व्यवस्था आहे.
भारतीय जनतेची मानसिकता ही जातीय प्रवर्गीय वर्गीय आणि धर्मीय आहे, म्हणून भारतीय जनतेची मानसिकता ही विषमतावादी आहे, म्हणून भारतीय व्यवस्था ही विषमतावादी आहे विषमतेची आहे.
भारताचे असेही विषमतावादी चित्र आहे, भारतीय जनतेची मानसिकता पण विषमतावादीच आहे, म्हणूनच आपल्या देशात आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक सांस्कृतिक प्रत्येक क्षेत्रात अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, भारत देश हा समस्याग्रस्त देश आहे. भौतिक समस्यांनी वेढलेला हा देश आहे, म्हणून भारतातील प्रत्येक नागरिक हा मनोरुग्ण आहे.
भारतीय माणसाच्या मेंदूला मनाला आणि शरीराला जडलेले रोग नष्ट करायचे असतील तर, आपल्या देशाची विषमतावादी भौतिक व्यवस्था बदलावी लागेल, त्याबरोबरच भारतीय नागरिकाची विषमतावादी मानसिकता बदलून ती समतावादी करावी लागेल.
देशाची बहुतेक व्यवस्था आणि देशातील नागरिकाची मानसिक अवस्था बदलण्याचा क्रम ठरविता येणार नाही, हे दोन्ही काम एकाच वेळी करीत राहावे लागणार आहे. देशाची भौतिक व्यवस्था म्हणजेच आर्थिक विषमता आणि सामाजिक विषमता आणि धर्मांधता यासाठी रस्त्यावरची लढाई करावी लागते. याचबरोबर भारतीय नागरिकाची विषमतावादी मानसिकता नष्ट करण्यासाठी वैचारिक लढाई करावी लागते, या दोन्ही लढाया आधी का नंतर ? असा संभ्रम न बाळगता एकाच वेळी समांतर पणे कराव्या लागतात, तेव्हाच कुठे समतावादी क्षमतेची व्यवस्था निर्माण होत असते.
” जशी व्यवस्था तशी सत्ता “. म्हणजेच विषमतावादी व्यवस्था असेल तर सत्ता पण विषमतावादीच असणार, आणि देशात समतावादी व्यवस्था असेल तर सत्ता पण क्षमतावादीच असणार या शंका नसावी.
देशाची जशी व्यवस्था तशी अवस्था असते आणि तशीच सत्ता पण असते. म्हणजेच व्यवस्था अवस्था आणि सत्ता हे एकत्रच नांदत असतात आणि ते एकमेकावर अवलंबून असतात, कारण त्यांची ती गरज असते.
प्रतिनिधी हा दरिद्री गरीब मध्यम श्रीमंत यापैकी कोणत्याही वर्गाचा असो, तसेच कोणत्याही जातीचा किंवा प्रवर्गाचा असो, तसेच तो हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन बौद्ध इत्यादी कोणत्याही धर्माचा असो, तो जर विषमतावादी विचाराचा असेल, म्हणजेच त्यास आपल्या देशात आर्थिक विषमता सामाजिक विषमता आणि धर्मांधता असावी असे वाटणारे लोकप्रतिनिधी जर असतील तर अशांचीच सत्ता असणार, आणि हे लोक सत्तेत जाऊन विषमतावादी व्यवस्थाच जोपासण्याचे काम करणार, हे निर्विवाद आहे. म्हणून लोकप्रतिनिधी हा कोणा वर्गाचा? कुण्या जातीचा? कुण्या प्रवर्गाचा? कुण्या धर्माचा? हाय विषय महत्त्वाचा नसून, तो कोण्या विचाराचा आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे? तो विषमतावादी विचाराचा आहे की समतावादी विचाराचा? हा मुख्य प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर मतदाराकडे काय आहे? यावर विषमता वाद्यांची सत्ता ती समता व त्यांची सत्ता आणि व्यवस्था, हे ठरत असते. यासाठी मतदाराची मानसिकता समतावादी बनवावी लागते, तेव्हाच परिवर्तन बदल होत असतो, आपल्या भारत देशाचे अशोक चक्र म्हणजे परिवर्तन चक्राची ती निशाणी आहे, हे चक्र उलटे फिरवायचे की सुलटे फिरवायचे? हे मतदाराच्या हातात आहे. मतदाराच्या बुद्धीवर आणि मनावर आहे. म्हणून उमेदवार निवडताना वर्ग जात प्रवर्ग धर्म या गोष्टीस महत्त्व न देता तो उमेदवार धर्मवादी नाही, जातीवादी नाही, प्रवर्गवादी नाही, वर्ग वादी नाही. हे पाहूनच मतदान करण्याची आवश्यकता आहे, तरच अशी निवडणूक ही समतेची समतेसाठी झालेली निवडणूक असे समजावे, अन्यथा ही निवडणूक म्हणजे विषमतेसाठी विषमतेची निवडणूक होय, असाच अर्थ काढावा.
सारांश, ज्या देशाची जशी व्यवस्था तशी जनतेची अवस्था, आणि ज्या देशाची जशी अवस्था तशी त्या त्या देशाची सत्ता असते.
आज बाबासाहेबांची जयंती आहे, बाबासाहेबांना हा लेख अर्पण आहे. याचे कारण बाबासाहेबांनी मनमाड येथे कामगार कामगारांच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाची प्रेरणा हा या लेखा मागचा संदर्भ आहे. कामगारांना उद्देशून आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले ” कामगार कष्टकरी श्रमिक यांचे आणि देशाचे ब्राम्हणशाही आणि भांडवलशाही हे मुख्य दोन शत्रू आहेत.” म्हणून शत्रूशी लढल्या शिवाय संरक्षण करून घेता येत नाही.ब्राम्हणशाही ही जातीव्यवस्था आणि धर्मांधता या पायावर आधारित आहे.म्हणून या दोन गोष्टी संपवाव्या लागतील.तसेच भांडवलशाही आणि जमीनदारी ही जमिनीचे असमान वाटप,आणि संपत्तीचे असमान वाटप यावर अवलंबून आहे.म्हणून समाजवादाचे विचार रुजणे गरजेचे आहे.
भांडवलशाही व्यवस्था ही व्यक्ती स्वातंत्र्य आणि मतदानाचा हक्क देते, पण व्यवस्था बदलण्याचा हक्क देत नाही. खाजगी मालमत्तेचा हक्क राखून ठेवते, तो जोपासण्याचे, त्याचे संरक्षण करण्याचे कर्तव्य सांगते. खाजगी मालमत्तेच्या हक्कातूनच वर्ग निर्माण होतात, आर्थिक विषमता निर्माण होते. खाजगी मालमत्तेच्या हक्कात बॅलन्स राखणे, समतोलपणा ठेवणे, म्हणजेच समाजवाद होय. आणि खाजगी मालमत्तेचा हक्कच संपुष्टात आणणे म्हणजेच साम्यवाद होय.
व्यवस्थेचे तीन प्रकार आहेत, 1 भांडवलशाही अर्थव्यवस्था.2 समाजवादी अर्थव्यवस्था.3 साम्यवादी अर्थव्यवस्था. या तीनही व्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्य असते म्हणजेच लोकशाही असते, पण असे स्वातंत्र्य किंवा असे लोकशाही म्हणजेच भांडवली लोकशाही, समाजवादी लोकशाही, साम्यवादी लोकशाही . असे लोकशाहीचे तीन प्रकार हे त्या त्या व्यवस्थेवरून पडतात. जी आणि जशी व्यवस्था तशी लोकशाही असते. आणि तसेच व्यक्ती स्वातंत्र्य पण असते. उदा. खाजगी मालमत्ता जोपासण्याचे स्वातंत्र्य आणि खाजगी मालमत्ता समान स्वरूपात असावी, अशा प्रकारची पेक्षा करणारे समाजवादी व्यक्ती स्वातंत्र्य, तसेच खाजगी मालमत्तेचा हक्क आणि अधिकार व्यक्तीस नसावा तर तो अधिकार देशाचा म्हणजेच सामूहिक असावा, अशी अपेक्षा करणाऱ्या समाजाची वैयक्तिक स्वातंत्र्य. असे वैयक्तिक स्वातंत्र्याची तीन प्रकार करता येतील. या तीन प्रकारांपैकी ज्या व्यक्ती स्वातंत्र्याची अपेक्षा देशातील बहुसंख्य जनतेला असेल, अशीच लोकशाही त्या देशात नांदेल. याचा अर्थ आपल्या देशात भांडवले लोकशाही, जिथे खरेदी विक्री होते, अशी लोकशाही असावी, की समाजवादी लोकशाही असावी की साम्यवादी लोकशाही असावी, हे मतदाराच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आम जनतेला ज्या व्यवस्थेत सुख शांती समाधान मिळते, प्रत्येकाच्या सुप्त गुणाला आणि कौशल्याला वाव मिळतो, आणि त्या व्यवस्थित माणसाचे आर्थिक प्रश्न सुटतात, सामाजिक समस्या नसतात, ताण तणावाचे वातावरण नसते, अशीच व्यवस्था माणसाला हवी असते, ती त्याची मूलभूत गरज असते, हा धागा पकडून आपणास हवे ते परिवर्तन घडवून आणता येते.


