प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
भारतातील असं कोणतंही क्षेत्र नाही की,ज्या क्षेत्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नाही.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हा विषय जात,धर्म,पंथ,प्रदेश,यापुरता मर्यादित नाही.तर आधुनिक भारताचे निर्माते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारताची जागतिक ओळख ठरले आहेत.
युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं संपूर्ण आयुष्य व कर्तृत्व जर पाहिलं तर एक गोष्ट नक्की लक्षात येईल,त्यांनी पूर्ण आयुष्यभर चुकीच्या रूढी,परंपरा,प्रथा,ज्या चालीरीती माणसाचं माणूसपण नाकारतात,त्यांना उघडपणे शह देणारे आहे,विरोध करणारे आहे.
अशाच प्रकारे जे पुस्तक माणसाचं माणूसपण नाकारुन विषमता आणि भेदभाव पसरवतं,स्त्रियांचे-पुरुषांचे हक्क अधिकार नाकारतं,ते पुस्तक म्हणजे मनस्मृती होय.अशा भेदभाव करणाऱ्या व हक्क नाकरणाऱ्या,”मनुस्मृती, पुस्तकालाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर नाकारतात,फक्त नाकारत नाहीत तर जाळतात.
विचार करा जगातील एक महान पुस्तकप्रेमी,महान पुस्तके वाचक विचारवंत,”मनुस्मृती सारखे,एक पुस्तक जाहीरपणे जळतात म्हणजे ते पुस्तक किती विषारी असेल?..”डॉ.बाबासाहेब आंबेडकर आयुष्यात अशा अनेक गोष्टी उघडपणे नाकारतात व त्या का नाकारतोय याचं स्पष्टीकरणही देतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा हा सगळा संघर्ष जर अभ्यासपूर्णरीत्या पाहिला,लक्षात घेतला,तर आजच्या पिढीने या सर्वांमधून शिकण्यासारखी गोष्ट ही आहे की,चुकीच्या गोष्टींच्या विरोधामध्ये तुम्हाला निर्भीडपणे,मोठ्या धैयनि ठामपणे उभे राहता आलं पाहिजे.चुकीला चूक म्हणण्याचे आणि चांगल्या गोष्टीचं कौतुक करण्याचे नैतिक धैर्य तुमच्याजवळ असलं पाहिजे..
नाहीतर आजकाल लोक स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा भीतीपोटी,चुकीच्या गोष्टींनाही प्रोत्साहन देतात,चुकीच्या गोष्टींना विरोध करण्याऐवजी,त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात.त्यामुळे एकूण समाजाचं मोठं नुकसान होत असतं.म्हणून महापुरुषांची नावे घेणाऱ्या प्रत्येकाने चुकीला चूक म्हणण्याचं धैर्य बाळगले पाहिजे.
आजपासून १०० वर्षांपूर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती चूक आहे,हे ठणकावून सांगण्याचं धैर्य बाळगलं होतं.आज १०० वर्षांनंतरही अनेकांमध्ये हे धैर्य आलेलं नाही.कोणत्याही दबावाला बळी न पडता आपली स्पष्ट भूमिका मांडणारे धैर्यवान योद्धा होते डॉ.बाबासाहेब आंबेडकर!
प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या कृतींमधून शिकण्याची दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे,बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही गोष्टीला अभ्यासाविना विरोध करत नाहीत.मनुस्मृती वाईट आहे,हे समजण्यासाठी बाबासाहेब त्या मनुस्मृतीचा अभ्यास करतात.
एवढेच नाही तर अनेक ग्रंथांची जी भाषा होती,ती संस्कृत!,”संस्कृत भाषा शिकण्याची डॉ बाबासाहेब आंबेडकरांना परवानगी नव्हती.परंतु मोठ्या कष्टाने,स्वयंअध्ययनातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संस्कृत साध्य केली आणि ते इतर दर्जाची संस्कृत लिहित,वाचत आणि समजून घेत होते.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मनुस्मृती समजून घेतात आणि ति समाज हिताची नाही,जातीय विषमता पेरणारी आहे,स्त्रियांच मानुसपण नाकारणारी आहे हे सांगून मनुस्मृती नाकारतात,इंथ प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची अभ्यासू वृत्ती लक्षात घेतली पाहिजे.
जे तरुण नव्याने राजकारणात येऊ इच्छितात,यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमीवर नाही,ज्यांच्याकडे पैसा नाही,ज्यांना प्रस्थापित पक्ष संधी देत नाहीत,अशा देशातील सर्व नवतरुणांसमोर शून्यातून स्वतःचं नवं राजकीय अस्तित्व उभं करणारे आणि देशाची एकहाती सत्ता सांभाळणाऱ्या काँग्रेसला,थेट दिल्लीला शह देणारे धुरंधर राजकारणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे ‘पॉलिटिकल आयडॉल’ आहेत.
आजही आपण कोणतेही कार्य हाती घेताना,कोणत्याही गोष्टीला विरोध करताना किंवा कोणत्याही गोष्टीवर टीका करताना,आधी त्यातील चांगल्या वाईट गोष्टीचा सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे.अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी अनेक माणसं समाजामध्ये आहेत.
पण असं न करता,कोणत्याही गोष्टीचा परिपूर्ण अभ्यास करून मगच त्यावर भाष्य केले पाहिजे,हे आपण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून शिकले पाहिजे.
या घटनांमधून प्रत्येकाने शिकावी अशी तिसरी गोष्ट म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही गोष्टीला फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करत नाहीत.”विरोध करायचा,चर्चा घडवून आणायची,सामाजिक स्वास्थ्य बिघडवायचं,स्वतःचा स्वार्थ साधायचा आणि विषय सोडून द्यायचा,असे प्रकार बाबासाहेब आयुष्यात कधीच करत नाहीत.
विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्या गोष्टींना विरोध करतात,त्यांना ठामपणे विरोधच करतात.या ठिकाणी लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे,बाबासाहेब ज्यां गोष्टींना विरोध करतात,त्या गोष्टींना देशहिताचे,मानवी हिताचे नवे पर्याय स्वतः उभे करतात.ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
जेव्हा आम्ही एखादी गोष्ट नाकारतो,एखाद्या गोष्टीवर टीका करतो,तेव्हा आम्हाला चांगली गोष्ट काय आहे? आणि त्या चुकीच्या,वाईट गोष्टीला पर्याय काय आहे? हेही सांगता आलं पाहिजे.युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यामध्ये ज्या-ज्या गोष्टी नाकारतात,त्या-त्या सर्व गोष्टींना स्वतः पर्याय म्हणून उभे राहतात,स्वतः पर्याय निर्माण करतात.त्यासाठी आयुष्य पणाला लावतात,अहोरात्र कष्ट घेतात,झटतात,परंतु सक्षम पर्याय निर्माण करतात.हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
जागतिक दर्जाचे महान अर्थतज्ञ ठरलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार केवळ भारतासाठी नाही तर संपूर्ण जगाकरीता प्रेरक आहेत.त्यांचे राजकीय धोरण आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनावर आधारित होते.त्यामुळे त्यांचे तत्त्वज्ञान हे विज्ञानवादी आणि मानवतावादी होते.म्हणूनच त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला असे थायलंडचे मेजर जनरल थनकस पुमपेच यांचे म्हणणे आहे.
अमेरिकेतील न्युयार्कपासून,कॅनडातील यार्क युनिव्हर्सिटी पर्यंत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानाचा आणि विचारांचा प्रभाव एकविसाव्या शतकात दिसून येत आहे,ही समस्त भारतीयांसाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे.ज्या देशात मुकनायक डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिकायला गेले नव्हते,त्या कॅनडालाही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ज्ञानसुर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गदर्शक वाटतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीयांचेच नाही तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्रोत आहेत.जगात जिथे-जिथे अन्याय अत्याचार होत आहेत,तिथे-तिथे त्या शोषित,वंचित लोकांचं बळ आणि प्रेरणा डॉ.बाबासाहेब आंबेडकर आहेत.
तद्वतच अठराव्या शतकात स्थापन झालेले ऑस्ट्रेलियातील प्रथम क्रमांकाचे व राष्ट्रीय विद्यापीठ म्हणून मान्यता असणाऱ्या मेलबर्न विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर,हजारो विद्यार्थ्यांना मार्गदाता व स्फूर्तीदाता म्हणून सातत्याने उभे आहेत.
कोलंबिया विद्यापीठात अभ्यासासाठी जगातील विविध देशांतून येणारे विद्यार्थी हे उद्याच्या जगाचे मार्गदर्शक,जागतिक विचारवंत व आपल्या देशात जाऊन देश घडविणारे विविध देशांतील टाॅप स्टुडंट असतात,ज्ञानवंत असतात.असं उद्याच जग बदलवणाऱ्या जगातील महत्त्वाच्या विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मकथेचा अभ्यास करुन स्वत:ला सिध्द करावं लागतं आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान बघता,”नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ,समाजशास्त्रज्ञ,राज्यशास्त्रज्ञ गुन्नार मर्डाल म्हणतात,” पुढच्या पिढीसाठी स्वतंत्र भारताची दिशा ठरवणारे एक महान भारतीय म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे संपुर्ण जगाच्या स्मरणात राहतील!…
दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला १२ एप्रिल १९९० रोजी म्हणतात,”आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन आणि कार्यापासून प्रेरणा घेऊन आमचा संघर्ष सुध्दा त्याच आधारावर सुरु आहे.ज्या आधारावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी समाज परिवर्तनाचा प्रयत्न केला आणि यश मिळवलं.
म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जगातील पुतळे कर्तृत्ववाची साक्ष,अन् नव्या युगाची प्रेरणा देत आहेत.
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते,”ज्या राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले तर तो राजकीय पक्ष भारतीयांचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित भारतीयांचे स्वातंत्र्य तोच राजकीय पक्ष कायमचे घालवले!.
यामुळे भारत देशातील सर्व महिला-पुरुषांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या या वक्तव्याकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे,”असेच त्यांच्यावर पारतंत्र्याचे भिषण संकट काही राजकीय पक्षांकडून ओढवले जात आहे.


