Home Maharashtra “ते थोडक्यात बचावले,अन् राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जुनेद खान यांनी अवैधपणे...

“ते थोडक्यात बचावले,अन् राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जुनेद खान यांनी अवैधपणे चोरटी वाळू वाहतूक करणारे ४० ट्रक अडविले… — वाहन चालकांकडे वाळू उपसा व वाहतूकीचा परवानाच नव्हता. — उपविभागीय अधिकारी चिमूर,तहसीलदार चिमूर,ठाणेदार चिमूर यांना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रक थांबविले असल्याची माहिती देताच त्यांनी स्वत:चे केले फोन बंद…. — सर्व चोर चोर मावसभाऊ? — चिमूर तालुक्यातील सर्व अवैध धंदे बंद करण्यासाठी देणार निवेदन!,”होणार मोठे जनआंदोलन…

  •  रोखठोक

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक

         राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जुनेद खान हे चिमूर ते वरोरा जाणाऱ्या मुख्य मार्गावर चिमूर येथे कार्यकर्त्यांसह उभे असताना,”भरधाव वेगाने वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या ट्रक या वाहणाने त्यांना ओवरटेक करीत मारण्याचा प्रयत्न दिनांक १० एप्रिल २०२६ रोज शुक्रवारच्या रात्रोला ११ ते साडेअकरा वाजताच्या दरम्यान केला.

           हा प्रसंग अक्षरशः अंगावर काटे आणणारा होता असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.पण,वाळूच्या चोरट्या वाहतूकीला अनुसरून  चिमूर येथील स्थानिक नागरिकांच्या असुरक्षेला,महसूल गोळा न करण्याऱ्या उदेशाला,वाळूची चोरटी वाहतूक न रोखण्याला,स्थानीक अधिकारी जबाबदार आहेत,हे काल रात्रोच्या थरारक प्रसंगाने पुन्हा समोर आणले.

                                   राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांच्यासह उपस्थितांना ओवरटेक करुन मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चिमूर ते वरोरा राष्ट्रीय मार्गावरील लोखंडी पुलाजवळ स्वत:ची गाडी आडवी करून (चिमूर पासून २ किलोमीटर अंतरावर) वाळूची चोरटी वाहतूक करणारे सर्व ट्रक जिवावर उदार होऊन थांबविले.

        सर्व ट्रक थांबविल्यानंतर चिमूर उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे,चिमूर तहसीलदार श्रिधर राजमाने,चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांना, जुनेद खान यांनी भ्रमनध्वनी द्वारे अवैधपणे चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या सर्व वाहणांची माहिती दिली.

               त्यांनी मोका स्थळावर भरारी पथक,तलाठ्यांची व मंडळ अधिकाऱ्यांची टिम पाठवतो सांगितले.पण वाळू वाहतूक करणारे ४० चोरटी वाहणे थांबवली असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांनी चिमूर येथील जबाबदार अधिकाऱ्यांना माहिती देताच त्यांनी आपले फोन बंद करुन घेतले आणि कर्तव्यात कसूर करुन,कर्तव्यहिनतेचे बेजबाबदार दर्शन घडविले.

         तिन तास वाट बघितल्यानंतर जुनेद खान आणि उपस्थितांच्या लक्षात आले की,अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चोरांवर व वाहणावर कारवाई करण्यासाठी भरारी पथक व तलाठी-मंडळ अधिकाऱ्यांची टिम येणार नाही.

        यामुळे चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांचा कर्तव्य नाकर्तेपणा त्यांच्या लक्षात आल्याने,त्यांनी सदर वाळू भरलेले ३५ ते ४० ट्रक,हायवा,१२ चक्के वाहणे जावू दिले.

                मात्र,प्रश्न निर्माण होतो की,दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळूची चोरटी वाहतूक होत असताना चिमूर तालुक्यातील जबाबदार अधिकारी आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी,चंद्रपूर जिल्हा पोलिस अधीक्षक हे जबाबदार अधिकारी कुणाच्या इशारा वरुन,सांगण्यावरुन,चोरट्या वाळू वाहतूक वाहनावार कारवाई करीत नाही,फौजदारी कारवाई करीत नाही,हा प्रश्न अधिकच चिंताजनक आणि तितकाच गंभीर आहे.

जुनेद खान झाले सक्रिय…..

      चिमूर तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यासाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान हे सक्रिय झाले असून ते सोमवारला तहसीलदार चिमूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,एसडिपिओ चिमूर,ठाणेदार चिमूर यांना पक्ष पदाधिकाऱ्यांसह निवेदन देणार आहेत.

       आता त्यांच्या व राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांच्या रडारवर सट्टा व्यवसायिक,अवैध दारु पुरवठा व अवैध दारु विक्री करणारे धंदेवाईक,अवैध वाळू व मूरुम माफीया,वेश्याव्यवसायीक असणार आहेत.

तर आंदोलन करणार….

        निवेदन दिल्यानंतर चिमूर तालुक्यातील अधिकाऱ्यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद केले नाही तर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या द्वारे मोठ्या संख्येत व मोठ्या प्रमाणात चिमूर येथे जनआंदोलन करणार असल्याचे,”राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जेष्ठ व अनुभवी नेते जुनेद खान यांनी,”दखल न्यूज भारत वेब पोर्टलचे मुख्य संपादक यांच्यासोबत भ्रमनध्वनी द्वारे बोलताना स्पष्ट केले.

त्यांचा आरोप…..

        वाळूची चोरटी वाहतूक आणि इतर प्रकारचे सर्व अवैध धंदे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या पुढाकारातंर्गत सुरू आहेत.यामुळे चिमूर तालुक्यातील जबाबदार अधिकारी हे चिमूर विधानसभा मतदारसंघातंर्गत अवैध धंद्दयांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतात असा आरोप जुनेद खान यांचा आहे..

मुंबई मंत्रालयापासून ते चिमूर पर्यंत सर्वच जबाबदार चोर चोर मावसभाऊ आहेत काय?…..

          या अगोदर,”दखल न्यूज भारत ने,चिमूर तालुक्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे वास्तव,बादम्यांच्या माध्यमातून उघड केले.

         याचबरोबर चिमूर तालुक्यातील अवैध धंद्दयांची लेखी द्वारे माहिती,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य,जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर,एसडीएम चिमूर,एसडिपिओ चिमूर,तहसीलदार चिमूर,ठाणेदार चिमूर,ठाणेदार भिसी,यांना ई-मेल द्वारा दिनांक २५ फेब्रुवारी २०२६ ला देण्यात आली आणि अवैध धंदेवाईकांवर उचित कारवाई करण्याची आणि चिमूर तालुक्यातील सर्वच अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात आली.

       परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर,उपविभागीय अधिकारी चिमूर,तहसीलदार चिमूर,एसडिपिओ चिमूर,ठाणेदार चिमूर,ठाणेदार भिसी यांनी चिमूर तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याच्या व अवैध धंदेवाईकांवर आवश्यक कारवाई करण्याच्या मागणीकडे पाठ फिरवली.

        यामुळे मंत्रालयापासून ते चंद्रपूर जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्रपूर,चिमूर तालुक्यातील संबंधित अधिकारी,आमदार किर्तीकुमार भांगडिया हे,”चोर चोर मावसभाऊ आहेत काय? हा प्रश्न पडतो आहे.

केले उघडे….

      मात्र,दिनांक ११/०४/२०२६ च्या रात्रोला,” जेष्ठ नेते जुनेद खान यांनी,अवैधरित्या वाळू चोरीचे वाहतुक प्रकरण उघडे पाडल्याने,चंद्रपूर जिल्हातंर्गत अधिकाऱ्यांचे,आमदार किर्तीकुमार भांगडियासह,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे,अवैध धंद्याबाबतचे भ्रष्ट्र मनसुबे समोर आणले असे म्हणावे लागेल?