Home Maharashtra मुनघाटे महाविद्यालयात ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य’ या विषयावर व्याख्यान…

मुनघाटे महाविद्यालयात ‘महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य’ या विषयावर व्याख्यान…

भाविकदास करमनकर 

  धानोरा तालुका प्रतिनिधी 

स्थानिक, धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली व्दारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्षाचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले यांचे सामाजिक कार्य या विषयावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली.

          महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानमाले प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्ते डॉ.पंढरी वाघ, डॉ.दामोधर झाडे रासेयो विभाग प्रमुख, डॉ.प्रियंका पठाडे तर डॉ.राजू किरमीरे अध्यक्षस्थानी उपस्थित होते. 

        व्याख्यानमालेची सुरूवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पन करून करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक डॉ.वाघ यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्यावर सखोल मार्गदर्शन केले तर अध्यक्षीय भाषणामधून डॉ.किरमीरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. 

         कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विणा जम्बेवार, डॉ.गणेश चुदरी, डॉ.पंकज चव्हाण, डॉ.हरीष लांजेवार, प्रा. मानतेश तोंडरे,प्रा.ज्ञानेश बनसोड, डॉ.नितेश पुण्यप्रेड्डीवार, प्रा.प्रशांत वाळके, डॉ.सचिन धवनकर, श्री.राकेश बोंगीरवार,  श्री.मनोज नन्नावरे आणि महाविद्यालयातील बहुसंख्य रासेयो स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संखेने उपस्थित होते. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रियंका पठाडे यांनी संचालन श्री गौरव सोनुले तर आभार प्रदर्शन कु.यामीनी सोनुले यांनी व्यक्त केले.