लक्षवेधी
प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
१ एप्रिल २०२६ रोज बुधवार,रात्रो ०८ ते ०९ वाजताच्या दरम्यान पोलिस स्टेशन चिमूरच्या पोलिस अधिकाऱ्यांना एका नागरिकांचा फोन जातोय,चिमूर शहरातंर्गत,”मनीक नगर येथील एका इमारतीत,वेश्याव्यवसाय सुरु आहे.
याच संबंधाने काॅल केला जातोय आमदार किर्तीकुमार भांगडिया यांना,”त्यांना नंम्रपणे सांगितले जाते की,मानीक नगरमध्ये वेश्याव्यवसाय करणेवाल्यांचा बंदोबस्त करावे.आमदार किर्तीकुमार भांगडिया हे मानीक नगर येथील नागरिकांना आश्वस्त करतात वेश्याव्यवसाय बंद होईल आणि वेश्याव्यवसाय करणाऱ्यांचा छडा लावला जाईल!
इकडे १ एप्रिल २०२६ रोज बुधवारला चिमूर पोलिस ठाण्याची गाडी नऊ ते साडेनऊ वाजताच्या दरम्यान वेश्याव्यवसाय सुरु असलेल्या इमारती पुढे उभी होते आणि सदर इमारतीच्या खोल्यांची झडती घेतली जाते.
त्या इमारती मधून ३ मुलींना ताब्यात घेतल्या जाताय आणि पोलिस ठाणे चिमूर येथे त्या मुलींना नेल्या जाताय.नंतर काय तर काहीही कारवाई नाही.अर्थात प्रकरणावर पडदा टाकला जातोय.
वेश्याव्यवसाय प्रकरणावर पडदा टाकण्यामागचा हेतू काय? हे “ठाणेदार दिनेश लबडे आणि आमदार किर्तीकुमार भांगडिया,यांनाच माहिती.
पण,त्या इमारती मध्ये वेश्याव्यवसाय करणारा मुख्य सुत्रधार कोण? कुणाच्या नावाने इमारत आहे? वेश्याव्यवसायाचा सरगमा कोण? वेश्याव्यवसाय किती दिवसांपासून सुरु होता?त्या ताब्यात घेतलेल्या ३ मुली अल्पवयीन होत्या की सज्ञान होत्या? त्या मुली कुठे आहेत,कुणाच्या ताब्यात आहेत? मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यापुर्वीच त्या ३ मुलींना का म्हणून बेपत्ता करण्यात आले? वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तींचे लागेबांधे कुणासोबत आहेत? याचा शोध कोण घेणार असा प्रश्न आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांना आहे.
चिमूर क्रांतीभूमी आणि कर्मभूमी आहे.या इतिहासिक भूमीत,चारित्र्याचे धिंडवडे काढणारा आणि जगप्रसिद्ध चिमूर शहराला बदनाम करणारा वेश्याव्यवसाय केला जातोय हे लाजीरवाणी बाब पोलिस विभागासाठी आहे.
चिमूरकर आणि त्यांची प्रतिष्ठा….
चिमूर शहरासह तालुक्यातील ग्रामीण भाग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली कर्मभूमी आणि क्रांतीभूमी आहे.तद्वतच स्वातंत्र्याची पहिली इतिहासिक भूमी आहे.अशा या पवित्र भुमीला कलंकित व बदनाम करण्याचा प्रयत्न कुण्यातरी नेत्यांच्या छत्रछायेखाली केला जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि स्वातंत्र्य संग्राम सैनिक या शहिदांच्या नावाने जगात ओळखल्या जाणाऱ्या कर्मभूमीत व क्रांतीभूमीत कोण वेश्याव्यवसायासारखा चारित्र्य हननाचा निच व्यवसाय करतो आहे याचा छडा पोलिस विभागाच्या यंत्रणेद्वारे लावला पाहिजे.
चिमूर शहर म्हणजे चिमूर करांची प्रतिष्ठा आहे,मान आहे,सन्मान आहे,चिमूरकरांचा जगप्रसिद्ध इतिहास आहे,हे त्यांनी विसरून चालणार नाही.
यामुळे चिमूर शहराला वेश्याव्यवसायाच्या माध्यमातून जो कोणी कलंकित आणि बदनाम करु इच्छितो त्याचा शोध घेण्यासाठी चिमूरकरांनी जागे झाले पाहिजे.नव्हे तर स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क झाले पाहिजे.
जाब विचारला पाहिजे….
चिमूर शहरात वेश्याव्यवसाय कुणाच्या छत्रछायेखाली आणि आशिर्वादात चालतोय यासंबंधाने आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि ठाणेदार दिनेश लबडे यांना जाब विचारला पाहिजे,असेच भयंकर गंभीर प्रकरण आहे.
तद्वतच आमदार किर्तीकुमार भांगडिया आणि चिमूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार दिनेश लबडे यांनी चिमूर शहरातंर्गत मानीक नगर येथील वेश्याव्यवसाय करणाऱ्यांना व वेश्याव्यवसायात अल्पवयीन,सज्ञान मुलींना ओढणाऱ्यां सुत्रधारांना बेड्या अजूनपर्यंत का म्हणून ठोकलेल्या नाहीत? याचे उत्तर चिमूरकरांना देण्याची तसदी कर्तव्य म्हणून घेतली पाहिजे.
चिमूरकरांनी दुर्लक्ष करु नये..…
चिमूर शहरात अल्पवयीन,सज्ञान मुलीवर अत्याचार झाले आहेत.याच बरोबर चिमूर शहरात वेश्याव्यवसायांने डोके वर काढले आहे.
यामुळे भविष्यात चिमूर येथील आणि चिमूर तालुक्यातील मुली व महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी चिमूर शहरातील व चिमूर तालुक्यातील नागरिकांनी,आयाबहिणींनी सदैव तत्पर राहिले पाहिजे,प्रसंगी रस्त्यावर उतरले पाहिजे,या मताचा कायदा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडे लक्ष दिले पाहिजे…..
चिमूर तालुक्यातील वेश्याव्यवसायासह अवैध धंद्यांकडे आमदार किर्तीकुमार भांगडिया,महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी,दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांच्या मनावर गंभीर विपरीत परिणाम पडू लागला आहे.नागरिक असुरक्षित होवू लागली आहेत.तद्वतच खरबो रुपयांचा महसूल अवैध उत्खनाद्वारे बुडविण्यात आला आहे.
याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यातील महसूल अधिकारी व पोलीस अधिकारी हे,अवैधरित्या वाळू व मूरुमांचे सदोदित उत्खनन करणाऱ्या माफीयांना,सट्टा व्यवसायिकांना,अवैध देशी दारू विक्रेत्यांना,वेश्याव्यवसाय करणेवाल्या सुत्रधारांना संरक्षण देत असल्याने,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमूर तालुक्यातील अवैध धंद्यांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे या मताची जनता आहे.








