दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : कुरळी – आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीत ठाकरे सेनेने महत्त्वपूर्ण यश मिळवले. जिल्हा परिषद गटात ठाकरे सेनेच्या विनया मुंगसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शितल येळवंडे यांचा पराभव केला. या लढतीत भाजपच्या कल्पना गवारी यांचे डिपॉझिट जप्त झाले.
कुरळी गणात ठाकरे सेनेच्या गौरी मुर्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सारिका गवारे आणि शिंदे सेनेच्या तनुजा पवार यांचा पराभव करत विजय मिळवला. तिरंगी लढतीत मतदारांनी ठाकरे सेनेच्या उमेदवारावर विश्वास दाखवला. दरम्यान, आळंदी ग्रामीण गणात राष्ट्रवादी काँग्रेसचे निखिल थोरवे यांनी ठाकरे सेनेचे काळुराम थोरवे यांचा पराभव करत विजय मिळवला. त्यामुळे आळंदी ग्रामीण गणात राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे.
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना विनया मुंगसे म्हणाल्या, “हा विजय माझा वैयक्तिक नसून कुरळी–आळंदी ग्रामीण भागातील सामान्य मतदारांचा आहे. मतदारांनी विकास, पारदर्शकता आणि स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या राजकारणावर विश्वास टाकला आहे. जिल्हा परिषदेत सर्वसामान्यांचे प्रश्न, महिला सबलीकरण आणि मूलभूत सुविधांसाठी कटिबद्धतेने काम करणार आहे.”



