उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
भद्रावती तालुक्यातील मौजा चिचोर्डी,संताजी नगर येथील कायदेशीररीत्या खरेदी केलेल्या प्लॉटच्या जागेवर शासकीय मोजणीद्वारे बसविण्यात आलेले हद्दीचे पोल अतिक्रमणधारकांनी उपडून फेकले व सदर मालकी हक्क जागेवर अतिक्रमण केल्याचा धक्कादायक,गंभीर व संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकारामागे अनधिकृत अतिक्रमण करून भूखंड बळकावण्याचा स्पष्ट हेतू असल्याचे दिसून येत आहे.भूखंडधारक यांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर भूखंडाची शासकीय यंत्रणेमार्फत अधिकृत मोजणी करून सीमा निश्चित करण्यात आली होती.
शासनाच्या नियमानुसार हद्द दर्शविण्यासाठी पोल गाडण्यात आले असताना,काही समाजकंटक अतिक्रमणकारी यांनी जाणीवपूर्वक ते पोल उपटून फेकले व शासकीय कामकाजाची खिल्ली उडवली.हा प्रकार कायदा व शासनाच्या अधिकाराला थेट आव्हान देणारा आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत भद्रावती पोलीस ठाण्यामध्ये तत्काळ रीतसर तक्रार दाखल करण्यात आली आहे.तसेच नगर परिषद व तहसील कार्यालयामध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्था आहे.त्यामुळे त्यांनी प्लॉट खरेदीदार यांचे कडील अधिकृत विक्रीपत्र,सातबारा उतारा, शमहसूल नोंदणी,कर,फेरफार पावत्या,नगर परिषद फेरफार,कर पावती,भूमी अभिलेख कार्यालयाची सरकारी मोजणी केलेली दस्तऐवज, त्यानुसार सर्व अधिकृत कागद पत्रांची पडताळणी करूनच रीतसर नोटीस अतिक्रमणधारकांना दिली आहे.
कारण ही जागा नगर परिषद हद्दीतच असल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये व कोणीही मालकी हक्काच्या प्लॉटवर अतिक्रमण करून जागा लबाळीने बळकावण्याचा किंवा जोर-जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यावर हस्तक्षेप करून न्यायोचित मार्ग काढण्यासाठी नोटीस देऊन,लिखित स्वरूपाची कार्यवाही करण्याचा नगरपरिषदेचा अधिकार आहे.त्यामुळे नगर परिषदेनी अतिक्रमणधारकांना नोटीस दिलेला आहे.

हा प्रकार केवळ खासगी मालमत्तेवरचा हल्ला नसून शासकीय प्रक्रियेचा अवमान व सार्वजनिक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचे भूखंडधारकांनी स्पष्ट केले आहे.
अतिक्रमणधारक हे,स्वतःच्या लालसेपोटी धमकावून अतिरिक्त पैशाची मागणी भूखंडधारकांना करीत असल्याचा आरोप आहे.
आरोपींची नावे युगेश खोब्रागडे,मनोज आष्टंनकर,रितेश वाढई,सुरेश मास्के,खुशाल मास्के,हरी खोब्रागडे,विनोद कामडी,संदीप खटीक,सुनील वसंत डागे,बाबा तराळे,कवीश्वर शेंडे हे सर्व अतिक्रमणकारी,घुसखोर आरोपी असल्याचे सांगितले आहे.
सदर भूखंडावर अतिक्रमणाचा धोका कायम असल्याने व तसेच शासकीय मोजणीचे पोल काढणाऱ्यांवर व अतिरिक्त पैशाची मागणी करणाऱ्यांवर तसेच जे अज्ञात दलाल या प्रकरणात विनाकारण हस्तक्षेप करीत आहेत,त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करून तातडीने कारवाई करावी अशी मागणी तक्रारदारांनी तक्रारी द्वारे पोलीस स्टेशन भद्रावती मध्ये केली आहे.

तद्वतच प्लॉटधारकांना कोणत्याही प्रकारचा धोका झाल्यास सर्वस्वी जबाबदार हे समाजकंटक आरोपी राहतील,अशी ठाम मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून कायदेशीर भूखंडधारकांना न्याय द्यावा,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दलालांनी भुखंडधारकांना धमकावीत अतिरिक्त रुपयाची मागणी केली व शासकीय कामावर अडथळा निर्माण केला आहे.याचबरोबर शासकीय मोजणीचे पोल उपटून व अतिक्रमण करून भूखंड बळकावण्याचा प्रयत्न केला असल्याने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे..



