ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व्हॉईस ऑफ मीडिया तसेच तालुका पत्रकार संघाचे वतीने मंगळवार दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी तालुका पत्रकार संघाचे ऑफिस येथे पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.गंगाधर जुवारे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून प्रा.दौलत धोटे , विलास गोंधोळे, भिमराव ढवळे, अनिल सोमनकर अध्यक्ष तालुका पत्रकार संघ आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मार्गदर्शन करताना अध्यक्ष प्रा. जुवारे सर यांनी पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजात सत्य, पारदर्शकता आणि लोकहितासाठी काम करत राहावे व दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर यांना यांना स्मरून म्हटले की पत्रकारांनी धैर्य व चिकाटीने कार्य करावे असे सांगितले. पत्रकारांनी एकजूट ठेवून निर्भीडपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
अनिल सोमनकर अध्यक्ष तालुका पत्रकार संघ यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
यावेळी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास व्हाइस ऑफ मिडियाचे तालुका अध्यक्ष ऋषी सहारे, सुरेश कांबळे, प्रा. बोदेले,लोनबले, प्रशांत दोनाडकर सामाजिक कार्यकर्ते, लिलाधर मेश्राम, रोहिदास बोदेले, आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. झिमटे व आभार प्रदर्शन रूमदेव सहारे यांनी केले.



