चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली :- येथील कृष्णमुरारी कटकवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय साकोलीच्या राष्ट्रीय पर्यावरण सेवा 6.0, इको क्लब फॉर लाईफ मिशन तसेच राष्ट्रीय हरित सेना यांच्या अंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब तर्फे पक्षी सप्ताह ,पक्षी दिन निमित्ताने सेंदुरवाफा रानतलावावर तसेच गाव तलावावर पक्षिनिरीक्षण व पक्षी जागृती कार्यक्रम प्राचार्य बी एस लंजे सर यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
यावेळी नेचर क्लब सदस्य विद्यार्थ्यांनी चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सेंदुरवाफा गाव तलाव व रानतलावावर सायकलने निसर्गभ्रमंती करीत अनेक पक्ष्यांचे व फुलपाखरांचे दर्शन जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लब संघटक प्रा.अशोक गायधने व नेचर क्लब विद्यार्थी अध्यक्ष संघदीप तरजुले यांनी घडविले.
यामध्ये त्यांनी खंड्या,कवड्या मासेमार, लालबुड्या बुलबुल, भारतीय दयाळ, गायबगळे , छोटे बगळे,मध्यम बगळे, छोटे पाणकावळे, काळा कोतवाल,ठिपकेवाली मुनिया,करडा धनेश, शिक्रा, जांभळी पाणकोंबडी, वेडा राघू,भारद्वाज इत्यादी पक्ष्यांचे दर्शन विद्यार्थ्यांना घडले. यानंतर प्रा.अशोक गायधने यांनी सेंदुरवाफा रानतलावाच्या काठावर विविध पक्ष्यांचे व फुलपाखरांचे चार्ट व फोटो दाखवून विद्यार्थ्यांमध्ये पक्षी सप्ताह व पक्षी दिन निमित्ताने तसेच थोर पक्षीतज्ञ मारोती चितमपल्ली व डॉ.सलीम अली यांच्या जीवन कार्यावर प्रकाश त्यांच्या जयंती निमित्ताने मार्गदर्शन केले.
तसेच पक्षी अंधश्रध्दा व गैरसमज यावर सुद्धा त्यांनी जनजागृती केली. यानंतर विद्यालयात दुर्मिळ पक्षी सारस व रोहित यावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात मिडलस्कूल गटात प्रथम क्रमांक सुयोग तरजुले यास तर द्वितीय क्रमांक श्रीधर कापगते यास प्राप्त झाला. हायस्कूल गटात प्रथम क्रमांक दुर्वांशा चव्हाण हिला तर द्वितीय क्रमांक भैरवी बोरकर व तृतीय क्रमांक रिया बडोले हिला प्राप्त झाला. सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन प्राचार्य बी एस लंजे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्राचार्य बी. एस. लंजे, पुष्पा बोरकर,अंजना रणदिवे, रोहित पारधी, प्रा.शीतल साहू , प्रा.कृष्णा बिसेन यांनी सहकार्य केले.
या अभिनव अशा पक्षीनिरीक्षण व पक्षी जागृती कार्यक्रमामध्ये संघदीप तरजुले, गुंजन भांडारकर, वंश फंदे, अर्शद खान, गिरीश शहारे, चिराग साखरे, वेदांत राऊत, नयन सोनवाणे, शंतनु मांदरकर, अभिनव करिये, कल्याणी आंबेडारे, भार्गवी आमडारे, तृषा जांभूळकर, अनुष्का क्षीरसागर, केजल टेंभुरकर, एकता नागोसे, सोनल आवरकर, अनोखी मेश्राम, वंश पळसकर, मयंक कटनकर, वैदेही लांजेवार, स्वरा मेश्राम, स्वराली कापगते, विहंत वघारे, अपूर्व लाडे, अनंत लाडे, मयंक भरणे, अंश घोरमारे, श्रीधर कापगते, साहिल हातझाडे, पीयूष सलामे, मंथन कापगते, सुयोग तरजुले, पीयूष राऊत, हर्ष जांभूळकर, प्रगेय मोटघरे, देवश्री उदापूरे, गौरी बोरकर, राधिका रामटेके, किरण भरणे, मालविका खोब्रागडे या हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी तसेच ज्युनिअर सायन्स 11 वी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. कृष्णा बिसेन यांच्या मार्गदर्शनात पिटेझरी व थाडेझरी येथील एन. एन .टी आर साकोली कार्यालय मार्फत आयोजित पक्षी निरीक्षणात सहभाग घेतला त्याबद्दल प्राचार्य बी एस लंजे सरांनी सर्व सहभागी नेचर क्लब सदस्य विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
- कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता सर्वश्री शिक्षक वर्ग शिवदास लांजेवार, दिनेश उईके, संजय पारधी, ज्ञानेश्वर हुलकाने, नीलिमा गेडाम, कु. खुमेश्वरी चिचमलकर, पळसकर मॅडम,कु.पी.व्हि.हातझाडे व प्राध्यापक वर्ग सर्वश्री प्रा. केशव कापगते, प्रा.विनोद हातझाडे, प्रा.राजेश भालेराव,प्रा. प्रशांत शिवणकर,प्रा. ज्ञानेश्वर लांजेवार, प्रा. जागेश्वर तिडके, प्रा. नरेंद्र भदाडे,प्रा. कमलेश मडकवार, प्रा.स्नेहल मते, प्रा.कुंदा नेवारे,ग्रंथपाल हेमराज ठाकरे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी विनोद वाघाये, खुशाल उके इत्यादींनी अथक परिश्रम घेतले.



