Home Social दर्यापूर काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांची...

दर्यापूर काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी…

युवराज डोंगरे 

उपसंपादक 

खल्लार :- दर्यापूर काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन व सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ३१ ऑक्टोबर रोजी उत्साहात साजरी करण्यात आली.

        या कार्यक्रमात काँग्रेस कार्यकर्त्यांनी भारताच्या पहिल्या महीला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पित केली आणि सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांच्या महान कार्याचा गौरव केला.

        यावेळी ईश्वर बुंदेले, आतिष शिरभाते,दत्ता कुंभारकर,अनिल भारसाकळे, रामेश्वर चव्हाण, जम्मूभाई पठाण, मनोज बोरेकर, इरफान इनामदार,प्रकाश चव्हाण, रामेश्वर तांडेकर, प्रयश रवाळे, अज्जू पठाण,संतोष शिंदे महेंद्र घाटे, सोनू शाह, सुशिल गुरमाळे सह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.