प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाराष्ट्रभर मोर्चे काढले व सभा घेतल्यात.पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची तसदी घेतली नाही.उलट शेतकऱ्यांच्या कर्ज माफी प्रकरणाकडे त्यांनी जाणिवपूर्वक सातत्याने दुर्लक्ष केले.
याचबरोबर सत्ताधाऱ्यांचे आमदार व मंत्री हे शेतकऱ्यांना बेलगाम अपशब्दात बोलत होते,शेतकऱ्यांना अयोग्य शब्दात खुनावत होते,त्यांची मानहानी करीत होते.हे शेतकऱ्यांसाठी सर्व असाह्य होते.
म्हणूनच माजी आमदार बच्चू कडू यांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मोर्चांकडे व सभांकडे शेतकरी बारीक नजर ठेवून होते आणि त्यांच्याकडे संपूर्ण कर्जमाफी बाबत अपेक्षा ठेवून होते.
परंतु माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मोर्चाच्या व सभांच्या काळात सुध्दा,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार या बोललेल्या शब्दांची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना झाली नाही आणि त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही.
यामुळे माजी आमदार बच्चू कडू यांनी नियोजनबद्ध आखनी करुन शेतकऱ्यांच्या आणि दिव्यांगाच्या विविध मागण्या मंजूर करुन घेण्यासाठी नागपूरकडे आपला मोर्चा वळवला..
आमदार बच्चू कडू यांच्या शब्दाला महत्व देत कर्जमाफी मोर्चात शेतकरी बांधव लाखोंच्या संख्येने सहभागी झाले असून त्यांनी नागपूर,रायपूर,हैदराबाद,चंद्रपूर,वर्धा या राष्ट्रीय महामार्गाची वाहतूक ठप्प केली,सध्या या महामार्गावरील वाहतूकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
माजी मंत्री महादेव जानकर,माजी आमदार वामनराव चटप,रवीकांत तुपकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते या कर्जमुक्ती मोर्चात सहभागी झाले आहेत,आणि काही होणार आहेत.
आज दिनांक २९/१०/२०२५,ला दुपारी १२ वाजता पर्यंत महाराष्ट्र सरकारने सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाहीतर वाहतूक कोंडीची प्रचंड प्रमाणात समस्या निर्माण होवू शकते.याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो.
मात्र,बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली,”सरसकट कर्जमुक्ती साठी,शेतकऱ्यांनी दाखवलेली एकी व ताकद,महाराष्ट्र सरकारला घाम फोडणारी आहे…
शेतकरी म्हणतात सरसकट कर्जमुक्ती हवी,म्हैसीचे दुध ६५ रुपये लिटर तर गायीचे दूध ५० रुपये लिटर हवे.याचबरोबर शेतमालाला योग्य भाव हवा.
तद्वतच दिव्यांगाचे निराधार मानधन दरमहा होत नसल्याने त्यांच्या मुलभूत गरजांचे दमन केंद्र सरकार व राज्य सरकार करते आहे.यामुळे त्यांचे दरमहा मानधन वेळेवर मिळावे म्हणून आणि इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी ते सुद्धा मोर्चात सहभागी झाले आहेत.
मात्र,शेतकऱ्यांच्या एकीने महाराष्ट्र सरकारची झालेली कोंडी,”झोप उडवणारी ठरली आहे…



