प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
कोर्ट विद्यमान अपर विभागीय आयुक्त नागपूर यांनी जिवती तालुक्यातील मौजा कुंसुबीच्या ख-या २४ आदीवासीनां ४२ वर्षानंतर न्याय दिला आणि हक्कासाठी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात पाठविले.
आज कोर्ट विद्यमान अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संपूर्ण सुनावणी ऐकल्यावर हक्क मिळवून देण्यासाठी प्रकरण आदेशा करीता ठेवले असल्याची माहिती अपीलार्थी विनोद खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा यांनी दिली आहे.
सविस्तर असे की,आज अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात भद्रावती तालुक्यातील बरांज मोकासा येथील में कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी तसेच में कर्नाटक एम्टा कंपनी व बेलोरा येथील में अरबिंदो कंपनी,व कोरपना तालुक्यातील में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी विरुद्ध विनोद खोब्रागडे व संबंधीत शेतकरी यांनी कायदेशीर बोगस फेरफार विरुद्ध अपील दाखल केली होती.त्यावर आज सुनावणी झाली.
में कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड कंपनी व में कर्नाटक एम्टा कंपनी व त्यांचे वकील मंडळी नोटीस मिळुनही उपस्थित झाले नाही,यामुळे सदर प्रकरण लांबणीवर ढकलण्याचे त्यांचे मनसुबे असू शकतात.
पण,अवैध कोळशाचे उत्खनन मागील अनेक वर्षांपासून बोगस फेरफार करून सदर कोळसा कंपन्यांचे संचालक कशे काय करत आहे?असा प्रश्न आज अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात उपस्थित केला गेला.
में अरबिंदो कंपनी तर्फे वकील मंडळी आज उपस्थित झाले व दिल्ली उच्च न्यायालयाचा रिठ पीटीशन केस नंबर ५७६१/२०२१ टाकून तलाठी यांनी फेरफार घेतला आणि एका दिवसात मंडळ अधिकारी यांनी शहानिशा न करता त्या बोगस नोंदी प्रमाणित केल्या.
कंपनीचे नागपूर उच्च न्यायालयाचे जेष्ठ वकील उत्तर देताना म्हनतात की,तलाठी यांनी टायपिंग मिस्टेक मध्ये फेरफार घेतांना चुक झाली.
मग चुकीचे फेरफार आधारे में अरबिंदो कंपनी मागील तीन वर्षांपासून अवैध कोळशाचे उत्खनन कसे काय करीत आहे?हा प्रश्न उद्भवतो आहे.
में मानीकगढ सिमेंट कंपनी व आताची अल्टाटेक सिमेंट कंपनी विरुद्ध अपर विभागीय आयुक्त नागपूर यांनी विनोद खोब्रागडे व इतर शेतकरी यांनी दाखल केलेल्या अपीलावर न्याय मिळाला व हक्कासाठी अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा न्यायालयात पाठविले.
आज माननीय अपर जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेऊन प्रकरण हक्कासाठी आदेशाकरीता ठेवले.
कुंसुबीच्या ख-या २४ आदीवासीनां ४२ वर्षानंतर न्याय मिळाला,आता हक्क सुद्धा मिळणार असल्याचे वास्तविक संकेत आहेत.
चंद्रपूर जिल्हातंर्गत वरोरा येथील रहिवासी असलेले तलाठी व घटना अभ्यासक विनोद खोब्रागडे हे तिन्ही प्रकरणा अंतर्गत कायदेशीर बाजू अन्वये लढत असून संबंधित अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा हक्क मिळवून देण्यासाठी सातत्याने जागरूक आहेत.



