Home Maharashtra माजी महसूलमंत्री,आमदार एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी… — पोलिसांचा दुटप्पीपणा कर्तव्यहिन...

माजी महसूलमंत्री,आमदार एकनाथ खडसे यांच्या घरी चोरी… — पोलिसांचा दुटप्पीपणा कर्तव्यहिन नाही काय?

दिक्षा कऱ्हाडे 

 वृत्त संपादीका 

     माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे विधानपरिषद सदस्य आमदार एकनाथ खडसे यांचा घरी चोरी झाल्याचे आज सकाळी ९ वाजता उघडकीस आले आहे….

      राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील शिवराम नगरातील बंगल्यात चोरीची घटना घडलीय.ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

       एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील शिवराम नगरातील निवासस्थानी चोरट्यांनी मध्यरात्री दरवाजाचे कुलूप तोडत तळमजला तसेच पहिला मजल्यावरील खोल्यांमधील कपाट उघडून चोरी केली आहे. 

      नेमकं चोरट्यांनी किती मुद्देमाल चोरून नेलाय,ही माहिती अद्याप समोर आलेली नाही.घटनास्थळी पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी दाखल झाले असून त्यांच्याकडून पाहणी केली जात आहे.

      आता चोरांनी आपला मोर्चा विरोधी पक्षाच्या आमदारांकडे वळवला असून,विरोधी पक्षाच्या आमदारांना कंगाल करण्याचे नवे धोरण सुरू झाले असल्याचे दिसून येते.

         आमदार आणि नेत्यांच्या घरी चोरी झाली तर पोलिस खडबडून जागे होतात व चौकशीचे सुत्र वेगाने फिरवितात.गरीब व सामान्य नागरिकांच्या घरी चोरी झाली तर चोरीची तक्रार दप्तर बंद केली जात असल्याचे वास्तव आहे.

        पोलिसांची दुटप्पी भूमिका गोरगरिब नागरिकांसाठी मारक असून,पोलीसांचा अशाप्रकारचा दुटप्पीपणा कर्तव्यहिन नाही काय?