Home Maharashtra प्रवाशांना वारंवार बसतोय फटका,भंगार बसेसचे माहेर घर बनले चिमूर आगार…

प्रवाशांना वारंवार बसतोय फटका,भंगार बसेसचे माहेर घर बनले चिमूर आगार…

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

चिमूर :- चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुका स्थळ येथे असलेल्या बस स्थानक चिमूर येथील भंगार बसेस असल्याने,सदर चिमूर आगार भंगार बसेसचे माहेरघर असल्याचे प्रतीत होत आहे.

         अपघात होऊन एका वाहकांनी आपला जिव सुध्दा गमविला असल्याची घटना चिमूर वरोरा मार्गावर घडली.त्या आधी एका बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस मधील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती.

           मात्र चालक यांचे म्हणणे होते की बसचा स्टेअरींग लॉक झाल्याने हा अपघात घडला.

              महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे चिमूर आगारातील भंगार बसेसकडे दुर्लक्ष होतांना दिसत असल्याचे चित्र दिसून येत आहे.याचबरोबर भंगार बसेसचा अहवाल चंद्रपूर परिवहन प्रमुखांकडे चिमूर आगार प्रमुखांनी पाठवीला काय?हा प्रश्न सुध्दा महत्वाचा ठरतो आहे.

         चिमूर भिसी मार्गे नागपूर जाणारी बस क्रमांक MH-14,HG-8231 हि चिमूर बस स्थानकावरुन आज दिनांक २६/१०/२०२५ ला सकाळी ०९ वाजता सुटली असता भिसी बसस्थानक येथे पोहचली व बंद पडली.

         चालकाने बस सुरू करण्याचा प्रयत्नही केला,परंतु बस काही सुरू झाली नाही. त्यामुळे बस मधील प्रवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

       संबंधित काही प्रवाशांना नागपूरला दवाखान्यात जायचे होते तर कुणाला आवश्यक खाजगी कामासाठी जायचे होते.

        मात्र बस बिघडल्याने वेळेवर प्रवाशांना आपापल्या ठिकाणी पोहचता आले नाही,हे प्रवाशांचे दुर्दैव म्हणावे की एस.टी.महामंडळाचे?

        मात्र अश्या भंगार बसेसमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागलाय याचे काय?