Home देशविदेश त्या वाघांना सांगाना,मनुष्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला करु नकोय…

त्या वाघांना सांगाना,मनुष्यप्राण्यांसह पाळीव प्राण्यांवर हल्ला करु नकोय…

   उपक्षम रामटेके

मुख्य कार्यकारी संपादक 

            वाघ हा मुका प्राणी नाही,मात्र त्याच्या बोलण्याची परिभाषा मनुष्यांना कळत नाही,त्याला कान,डोळे,आणि मनही आहे.तो आपल्या मनाचा राजा आहे.त्याला वाटले की मला इथं राहायच आहे तो तिथेच राहतो,त्याला वाटले तेव्हा मनुष्य व पाळीव प्राण्यांवर हल्ला करतोय,तो केव्हाही गावात येतो आणि पाळीव प्राणी फस्त करून निघून जातोय,तो शेतकऱ्यांच्या शेतातही जातो,राहतो आणि त्याला पाहिजे तेव्हा शेत मालकाच्या,शेत मालकीनच्या गळ्याचा घोट घेतोय,तो रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांनाही मारतोय…

           म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या वनमंत्र्यांनी,वन अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी त्या वाघाला सांगाव,निष्पाप मनुष्यप्राण्याचा आणि पाळीव प्राण्यांचा बळी घेवू नकोय म्हणून!

          वाघ निष्ठूर आहे की,वाघाचे संरक्षण करणारे निष्ठूर आहेत,हा गंभीर विषय आहे.पण,निष्पाप नागरिकांचा आणि पाळीव प्राण्यांचा वाघ वारंवार बळी घेत असेल तर त्या वाघाला मोकाट फिरु द्यायचे काय?हा खरा प्रश्न आहे….

           वन विभाग आणि त्यांचे नियोजन रक्तपिपासू हिस्त्र वाघाला मोकाट फिरु देणारे असेल तर त्यांना मनुष्य प्राण्याच्या व पाळीव प्राण्यांच्या बाबतीत प्रेम आणि मैत्री नाही काय?

         तद्वतच रक्तपिपासू वाघांपासून मनुष्य प्राण्याचे व पाळीव प्राण्यांचे वेळीच संरक्षण करण्यासाठी वनविभागाकडे ठोस उपाययोजना का म्हणून नाहीत?

       त्या रक्तपिपासू हिस्त्र वाघाने कितीही नागरिकांचा आणि पाळीव प्राण्यांचा बळी घेतला तरी चालेल,पण अशा वाघाचा वेळीच बंदोबस्त करायचे नाही हे कसले वनविभाचे धोरण?आणि असे वेळकाढू धोरण वन विभागाला सोभनीय आहे तरी काय?

            चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांच्या क्षेत्रात मौजा लावारी (आंबोली) येथे शेतकरी महिलेचा शेतात काम करीत असताना तिच्या शेतातच वाघाने बळी घेतलाय आणि तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्राधिकारी क्षेत्रात मौजा बोळधा,मौजा सिरपूर,मौजा कोटगाव,मौजा सिवनपायली येथील गुराख्यावर जिवघेणा हल्ला केलाय.या सर्व घटना एकाच महिन्यातील आहेत.

       याचबरोबर चिमूर तालुक्यातील अनेक पाळीव प्राण्यांचा गोठ्यात घूसून व शेतशिवारात बळी घेतलाय.तरीही अशा रक्तपिपासू हिस्त्र वाघांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला जाग येत नाही? म्हणूनच मानुष्कीच्या बाहेरचे वनविभागाचे विचार व धोरण आहे असेच म्हणावे लागेल….

     पण,वाघाच्या हल्ल्यात एखाद्या घरचा कर्ता जिव जातोय नां,तेव्हा त्याचे संपूर्ण कुटुंबच अस्ताव्यस्त होतय,त्या कुटुंबातील लहान मुलांचे भविष्य अंधकारमय ठरतय,याकडे कोण लक्ष देणार?

         यामुळे,”वन विभागाला जनसामान्य नागरिकांचे, शेतकऱ्यांचे आवाहन आहे,”जरा त्या वाघांना सांगाना,”निरागस मनुष्य प्राण्याचा आणि पाळीव प्राण्यांचा बळी घेऊ नकोस म्हणून!….