Home Maharashtra उपसरपंच अशोक चौधरी करणार पाण्याच्या टाकीवर तिव्र आंदोलन! — त्या विभागाचे...

उपसरपंच अशोक चौधरी करणार पाण्याच्या टाकीवर तिव्र आंदोलन! — त्या विभागाचे वाभाडे येणार पुढे….

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी..

       कार्यकारी अभियंता,महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,चंद्रपूर यांना निवेदन दिले असून,त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मौजा शंकरपूर येथील जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत सुरू न झाल्यास 24 नोव्हेंबर 2025 रोजी पाण्याच्या टाकीवर चढून तीव्र आंदोलन करणार… 

        मौजा शंकरपूर येथे जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम मागील अडीच वर्षांपासून सुरू आहे.या योजनेसाठी अंदाजे सात कोटी रुपये खर्च करण्यात आले असू‌नही आजपर्यंत एकाही घरापर्यंत पाणी पोहोचलेले नाही.

        कामाची गती अत्यंत मंद आहे.ठिकठिकाणी अपूर्ण व निकृष्ट वनांचे काम झाले आहे.रस्त्याचे खोदकाम करून ते अर्धवट बुजवले गेले असून त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. 

         पाइपलाईन अपेक्षित खोलीपर्यंत टाकण्यात आलेली नाही स्विच रूमचे काम अपूर्ण असून सिमेंट आणि अन्य साहित्याचा दर्जा अत्यंत सुमार आहे.

        कामाच्या देखरेखीत डिसाळपणा दिसून येतो,कंत्राटदाराच्या कारभारात गंभीर अनियमितता असून देखील त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

       या सर्व प्रकारामुळे गावातील नागरिकांमध्ये तीव्र रोष आहे.शासनाच्या “हर घर नल हर घर जल” या मोहिमेचा केवळ प्रचार झाला,प्रत्यक्षात मात्र नागरिकांना काहीही लाभ मिळालेला नाही. 

        शासनाचा विश्वासघात झाल्याची भावना नागरिका मध्ये आहे.म्हणून अशोक ज्ञानेश्वर चौधरी,उपसरपंच ग्रामपंचायत शंकरपूर यांनी संबंधित विभागास सूचित केले आहे की जर 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष सुरू झाली नाही तर 24 नोव्हेंबर 2025 रोजी आठवडी बाजार,शंकरपूर येथील पाण्याच्या टाकीवर चढून “शोले” चित्रपट शैलीतील तीन आदोलन करण्यात येईल. 

       माझ्या या आंदोलनामु‌ळे उद्भवणाऱ्या कायदेशीर व आरोग्यविषयक परिणामांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागावर राहील असेही उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

          उपसरपंच अशोक चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की,ही बाब आंदोलनाची नसून,आमच्या गावाच्या मूलभूत हक्कांची आहे.

        यामुळे कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी व त्यांनी लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी अशी अपेक्षा उपसरपंच अशोक चौधरी यांनी व्यक्त केली आहे..

      उपसरपंच अशोक चौधरी यांनी निवेदनाच्या सत्यप्रतिलीपी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,ना.गुलाबरावजी पाटील मंत्री पाणीपुरवठा विभाग महाराष्ट्र राज्य,ना.अशोक उईके मंत्री आदिवासी विकास व पालकमंत्री चंद्रपूर,जिल्हाधिकारी चंद्रपूर,जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपुर,पोलीस उपविभागीय अधिकारी चिमूर,पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन भिसी यांना पाठवले आहे.

        सदर विभागाला उपसरपंच अशोक चौधरी यांनी अनेकदा पत्रव्यवहार केला,”पण,त्यांच्या महत्त्वपूर्ण लेखी पत्रांना कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग चंद्रपूर यांनी महत्व दिले नाही.

           कार्यकारी अभियंता यांच्या अनास्थेमुळे उपसरपंच अशोक चौधरी यांना मौजा शंकरपूर वाशियांच्या हितासाठी पाण्याच्या टाकीवर तिव्र आंदोलन करण्याची वेळ आली आहे.

       निवेदन देताना उपसरपंच अशोक चौधरी,महादवाडीचे सरपंच भोजराज कामडी उपस्थित होते.