राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
जिकडे तिकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांची दैन्यावस्था झाली आहे.यामुळे शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने वेळीच पुढे येणे गरजेचे झाले आहे.

याचबरोबर कुरखेडा तालुक्यातील मौजा मेंढा येथील शेतकरी जयदेव कोल्हे व वासुदेव कोल्हे यांच्या शेतातील धान अतिवृष्टीमुळे वापले असून (पावसामुळे धान पिकाचे कोंब निघाले असल्याने पुर्णतः पिक खराब झाले आहे.) त्यांच्या नुकसान झालेल्या धान पिकांचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात अशी मागणी सदर शेतकऱ्यांची आहे.
शेतकऱ्यांच्या तोंडांत आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असून शासनाने पिडीत शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांची आहे.



