दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आज देवाची आळंदी येथे स्वच्छता अभियान तसेच जिल्हा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
भाजपा पुणे जिल्हा (उत्तर) चे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियानातून “स्वच्छ भारत – स्वस्थ भारत” हा संदेश देण्यात आला.
त्यानंतर झालेल्या जिल्हा कार्यशाळेत आत्मनिर्भर भारत, नेक्स्ट जनरेशन जीएसटी, पदवीधर निवडणूक तसेच विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाला डॉ.राम गावडे, डॉ.ताराचंद कराळे, श्रीकृष्ण देशमुख, प्रिया पवार, रोहित खैरे, किरण येळवंडे, राहुल गव्हाणे, वैजयंता उमरगेकर, अमोल वीरकर, संजय घुंडरे, अनिल वाघमारे, अशोक कांबळे, दिनेश घुले, आकाश जोशी, शुभम धुर्वे, राहूल घोलप, संकेत वाघमारे, चारुदत्त प्रसादे, यांच्यासह जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



