Home Maharashtra के.खंडेरावजी पाटील शिसोदे यांचा ५७ वा स्मृतीदिन २८ सप्तेंबरला!… — स्मृती...

के.खंडेरावजी पाटील शिसोदे यांचा ५७ वा स्मृतीदिन २८ सप्तेंबरला!… — स्मृती दिनानिमित्त प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण येथे मार्गदर्शन कार्यक्रमाचे विशेष आयोजन…

दिक्षा कऱ्हाडे 

वृत्त संपादिका..

      ऐक्य एकात्मता निजबोध। या नाव गा ज्ञान शुध्द ।। या प्रमाणे प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्रतिष्ठान महाविद्यालय,पैठण द्वारे कै.खंडेरावजी पाटील शिसोदे यांच्या ५७ व्या स्मृती दिनानिमित्त २८ सप्टेंबर २०२५ रोज रविवारला मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन,”प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण,येथे करण्यात आले आहे.

     कै.खंडेरावजी पाटील शिसोदे ५७ वा स्मृतीदिन कार्यक्रमाची वेळ सकाळी ११:०० वाजता आहे.

       या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक म्हणून डॉ.अनंत राऊत, नांदेड हे असणार आहेत.ते राष्ट्रनिर्माणातील उच्च शिक्षणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

        तर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शिरीष लांडगे पाटील (प्राचार्य,जिजामाता महाविद्यालय,भेंडा,जि. अहिल्यानगर) हे असणार आहेत.

       सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री.रविंद्र पा. शिसोदे (अध्यक्ष, प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ, पैठण),श्री.राजेंद्र पा.शिसोदे (सचिव,प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ,पैठण),श्री.अशोकराव पा. निर्मळ (उपाध्यक्ष,प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ,पैठण),श्री.श्रीधरराव पा. शिसोदे (संचालक,प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ,पैठण) हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

       सदर कार्यक्रमाचे आयोजक व विनित डॉ.एस.जी. सोनकांबळे प्राचार्य,सर्व प्राध्यापक,कार्यालयीन कर्मचारी,विद्यार्थी,प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण हे आहेत.