कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारसिवनी
पारशिवनी :- त्र्यंबकेश्वर,जि. नाशिक येथे शनिवार दि.२० सप्टेंबर रोजी वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक केली व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या घटनेचा पारशिवनी शहरात व्हॉइस ऑफ मीडिया शाखेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे तीव्र निषेध व्यक्त केल्या जात आहे.या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया शाखा पारशिवनी तालुक्याच्या वतीने पारशिवनीचे तहसीलदार सुरेश वाघचौरे व पारशिवनी पोलिस निरीक्षक राजेशकुमार थोरात यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
आरोपींवर कारवाई झाली नाही तर व्हाईस ऑफ मीडिया देशभरात आंदोलन करणार,असे व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले.
शनिवार दि. २० सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वर, जि नाशिक येथे वार्तांकनासाठी गेलेल्या योगेश खरे,अभिजित सोनवणे आणि किरण ताजने यांच्यावर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर कार्यरत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
निवेदन देतेवेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष कल्याण अडकणे,सचिव पुनादास गजभिये,दशरथ आकरे,दिगांबर खुबाळकर,अनिल गजभिये,विकास रंगारी, धमक्कुलं गजभिये,सतीश साकोरे,प्रशांत सावरकर,सौ. निर्मला मरकाम,प्रमोद सुखदेवे,नरेंद्र भिमटे,पिंटू गजभिये,कमलाकर बंड, लीलाधर गजभिये,सुरेश गजभिये,ऍड.कार्तिक गजभिये व व्हाईस ऑफ मीडियाचे सहकारी उपस्थित होते.



