Home Maharashtra चतुर्थी श्रेणी ची मागणी करिता महसूल सेवकांचे काळ्या फिती लावून मागणी…

चतुर्थी श्रेणी ची मागणी करिता महसूल सेवकांचे काळ्या फिती लावून मागणी…

     रामदास ठुसे

नागपूर विभागीय प्रतिनिधी

 चिमूर :- आज 10 सप्टेंबर ला विदर्भ महसूल सेवक संघटना यांनी चतुर्थ श्रेणीच्या मागणी करता तहसील कार्यालय व ग्राम महसूल अधिकारी कार्यालय या ठिकाणी विविध महसूल सेवकांनी काळ्याफिती लावून शासनाकडे निषेध नोंदवून चतुर्थ श्रेणी मागणी केलेली आहे.

       ही मागणी मंजूर न झाल्यास तहसील कार्यालय समोर दिनांक 11 सप्टेंबर2025 रोजी धरणे आंदोलन व 12 सप्टेंबरला विदर्भ महोत्सव सेवक संघटनेतर्फे तालुका क्रीडा संकुल कोराडी महसूल मंत्री यांच्या घरासमोर बेमुदत धरणे आंदोलन व साखळी उपोषणच्या माध्यमातून विदर्भ महसूल सेवकांनी लढा उभारलेला आहे.

        या आंदोलनामुळे तालुकास्तरीय महसुली कामे, डी.एल.सी.,नैसर्गिक आपत्ती, संजय गांधी निराधार योजनेतील कामे, निवडणूक,तसेच इतर दैनंदिन कामकाजावर परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होणार असून नागरिकांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

           तरी शासनाने महसूल सेवकांना त्वरित चतुर्थ श्रेणीची मागणी बहाल करून नागरिकांना होणारा त्रासातुन सुटका करण्याचे करावे असे विदर्भ महसूल सेवक संघटना जिल्हा शाखा – चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष श्री दयाराम वंजारी यांनी केले आहे.

        यावेळी चिमूर तालुकाध्यक्ष आकाश चौधरी, ईश्वर बारेकर, प्रशांत खेडकर, गणेश बारसागडे,निखिल पोईनकर, राहुल सोनटक्के, विनोद गजबे प्रमोद गजबे, अजय बारसागडे, तसेच इतर महसूल सेवक उपस्थित होते.