Home Maharashtra मानव कुंडलवाडीकर लिखीत-संवाद (कविता संग्राह) व भारतीयांच्या जीवनाचा मौलिक दस्त-भारताचे संविधान या...

मानव कुंडलवाडीकर लिखीत-संवाद (कविता संग्राह) व भारतीयांच्या जीवनाचा मौलिक दस्त-भारताचे संविधान या पुस्तकांचे विमोचन ७ सप्तेंबरला… — कार्यक्रमाचे स्थळ मल्टिमीडिया हाॅल,पिपल्स काॅलेज नांदेड…

  उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

      मानव कुंडलवाडीकर लिखीत-संवाद (कविता संग्राह) व भारतीयांच्या जीवनाचा मौलिक दस्त-भारताचे संविधान या पुस्तकांचे विमोचन ७ सप्टेंबरला होणार असून,समारंभ कार्यक्रमाचे स्थळ मल्टिमीडिया हाॅल,पिपल्स काॅलेज नांदेड आहे… 

         कविता संग्रह पुस्तकाच्या विमोचन समारंभाचे अध्यक्ष प्रा.डॉ.अनंत राऊत,संविधान संस्कृतीचे संकल्पक असणार आहेत.

         विशेष अतिथी म्हणून प्रा.दत्ता भगत अ.भा. मराठी नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

         तद्वतच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.गणेशराज सोनाळे,प्रा.डॉ.रमेश हातोडे,औरंगाबाद हे असणार आहेत.

        मान्यवरांच्या उपस्थितीत कविता संग्रह पुस्तकाचे विमोचन प्रा.डॉ.राजेंद्र गोणारकर,प्राचार्य राम जाधव यांच्या हस्ते होणार आहे.

       या कविता संग्रह पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे वक्ते प्रा.डॉ. भारत कचरे,प्राचार्या अनुराधा एन.सी.,प्राचार्य डॉ. विकास कदम,प्रा.डॉ.कल्पना जाधव,असणार आहेत.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-मा.डॉ. भीमराव हाटकर करणार आहेत.

       दिनांकः ७ सप्टेंबर २०२५ रोज रविवारला सकाळी ११.०० वाजता मल्टीमीडिया हॉल,पीपल्स कॉलेज,नांदेड.येथे विमोचन समारंभाला प्रारंभ होणार आहे.

       कार्यक्रमाचे विनीत पूजा पब्लीकेशन नांदेड,भीम जयंती मंडळ व कुंडलवाडीकर मित्र परिवार राजेशनगर तरोडा नाका, नांदेड हे असून सदर कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.