प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
विरोधी पक्षनेते निवडणूक चर्चा दरम्यान आपली भूमिका स्पष्ट करताना आमदार विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले की,महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय देण्यासाठी आणि बेधुंद सरकारच्या कामकाजाला लगाम लावण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होणे आवश्यक आहे.
संख्याबळ न पाहता विधानसभेत विरोधी पक्षनेत्याची नेमणूक व्हावी.अधिवेशनाचे शेवटचे दोन दिवस उरले असल्याने ही नियुक्ती करावी,ही मागणी विधानसभा कामकाज कार्यपद्धतीवर बोलताना आज आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्रात संख्याबळाच्या आधारावर विरोधी पक्षनेत्याची नेमणूक होते अशी परंपरा नाही. असे आम्ही पाहिले नाही.
त्यामुळे नवीन परंपरा पाडू नये. महायुती सरकारला प्रचंड बहुमत मिळाले आहे,त्यांना लगाम घालायला आणि महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेत्याची गरज आहे.
विधानसभेचे कामकाज एकतर्फी होऊ नये.अधिवेशनाचे अंतिम आठवड्याचे काम ती खुर्ची खाली ठेवून कामकाज होऊ नये.अध्यक्षांना अधिकार आहे,त्यामुळे त्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पद विरोधी पक्षाना देण्याबाबत निर्णय घ्यावा ही आमची मागणी आहे असे माजी मंत्री तथा आमदार विजयभाऊ वडेट्टीवार म्हणाले.



