Home Crime उदमाजर शिकार प्रकरणी राठोड दांपत्यांची रवानगी कारागृहात…

उदमाजर शिकार प्रकरणी राठोड दांपत्यांची रवानगी कारागृहात…

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

     पळसगांव वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी ११ मार्चला दोन उदमांजर शिकार प्रकरणात कालू राठोड (३६) व त्याची पत्नी बबिता सोलंकी (४०) रा. अकोली,जि.वर्धा या दाम्पत्यांना अटक केली होती. 

      १५ मार्चला वनकोठडीची मुदत संपल्यानंतर आरोपीना सिंदेवाही न्यायालयात हजर करण्यात आले. 

      न्यायालयाने आरोपींनी न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यांची रवानगी चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. 

     वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता,यापूर्वीही त्यांनी अनेक वन्यप्राण्यांच्या शिकारात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

     आरोपींवर पोलीस विभागाशी क्रिमिनल स्वरूपाचे संबंधित गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.पत्नीने शिकार करण्यास मदत केली आहे.यामुळे त्यांचा याच्याशी काय संबंध हे देखील तपासले जात आहे.